होम आयसोलेशनची संख्या ४६०० ने वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:15 AM2021-03-15T04:15:50+5:302021-03-15T04:15:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नवीन रुग्ण अधिक आणि बरे होणाऱ्यांची संख्या कमी यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नवीन रुग्ण अधिक आणि बरे होणाऱ्यांची संख्या कमी यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून ही संख्या ७२७५ वर पोहोचली आहे. यात होम आयासोलशेनमध्येच राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या महिनाभरात ४६५२ ने वाढली आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ही परवानगी दिली जात असते.
जिल्ह्यात सक्रिय रुग्णांपैकी ५७९२ रुग्णांना लक्षणे नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून होम आयसोलेशनच्या नियमांमध्ये शिथिलता आल्यामुळे दोन दिवसांपूर्वी या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी होम आयासेालेशनची संख्याही घटल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत शासकीय व्यवस्थेत बेड वाढविण्यावर आता प्रशासनाकडून नियोजन केले जात आहेत. दहा दिवसांनंतर होम आयसोलेशनच्या रुग्णांना कोरोनामुक्त घोषित करण्यात येत असते. त्यामुळे ही संख्या कमी अधिक होत असते.
महिनाभरापूर्वी होम आयसोलेशनचे रुग्ण : ३००
१३ मार्च रोजी होम आयसोलेशनमधील रुग्ण ४९५२
सक्रिय रुग्ण : ७२७५
लक्षणे विरहित रुग्ण : ५७९२
लक्षणे असलेले रुग्ण : १४८३