जामनेर तालुक्यात कुपोषीत बालकांची संख्या चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 03:22 PM2019-04-12T15:22:36+5:302019-04-12T15:22:42+5:30

१७९ बालके अती तीव्र कुपोषित, पोषण आहार वितरणाबाबत तक्रारी

The number of malnourished children in Jamnar taluka is alarming | जामनेर तालुक्यात कुपोषीत बालकांची संख्या चिंताजनक

जामनेर तालुक्यात कुपोषीत बालकांची संख्या चिंताजनक

Next


जामनेर : तालुक्यातील तीव्र व अती तीव्र कुपोषीत बालकांची वाढत असलेली संख्या चिंताजनक आहे. अंगणवाड्यांची दुर्दशा, बालकांना वेळेवर पोषण आहार न मिळणे, आहार पाकीट वितरणातील सावळा गोंधळ, पोषण आहार पुरवीणाऱ्या बचत गटांची अनास्था यामुळे कुपोषणाची समस्या वाढत असल्याचे दिसुन येत आहे. महिला व बाल कल्याण विभागाकडुन झालेल्या सर्वेक्षणानुसार ६७ बालके अती तीव्र कुपोषीत तर १७९ बालके तीव्र कुपोषीत आहेत. शेवगे पिंप्री गावात सवार्धीक पाच कुपोषीत बालक असल्याचे सुत्रांनी सांगितले.
बालके कुपोषित राहू नये यासाठी शासनाकडून अंगणवाड्यांपासून आहार पुरजविला जातो. यानुसार तालुक्यातील ३९६ अंगणवाडीतील सुमारे ३५ हजार बालकांसाठी स्थानीक पातळीवरील बचत गटाच्या माध्यमातुन पोषण आहार दिला जातो. बचत गटांनी बालकांना दररोज शासनाने ठरवुन दिलेला आहार दिला पाहीजे असे निर्देश आहेत. मात्र जवळपास ८० टक्के अंगणवाडीत दररोज एकच प्रकारचा आहार दिला जातो व तो सुध्दा ठरलेल्या निकषानुसार नसतो. दररोज शिजवुन आणलेला भात दिला जातो तर गेल्या दोन महिन्यापासुन काही ठिकाणी बंद पाकीटातुन घरपोच दिल्या जाणºया आहाराची टीएचआर पाकीटे मिळाली नसल्याची माहिती मिळाली.
अंगणवाड्यांना योग्य जागा नाही
तालुक्यात बाल विकास प्रकल्पाचे काम दोन विभागात होत असुन, ३९६ अंगणवाड्या सुरु आहेत. अंगणवाड्यांना स्वमालकीच्या ईमारती नसल्याने बहुतेक भाड्याच्या जागेत तर काही जि.प.शाळा खोलीत, ग्रामपंचायतीच्या समाज मंदीरात तसेच काही गावातील मंदीर परीसरात भरवील्या जातात. काही वषापूर्र्वी उघड्यावर अंगणवाडी भरत असत, तशी स्थिती आता नसल्याचे प्रकल्प अधिकारी सांगतात. अंगणवाड्यांसाठी शासनाने जागा देऊन खोली बांधकाम करुन देणे अपेक्षीत आहे. जामनेर नगरपालीका क्षेत्रात २२ अंगणवाड्या भरतात, मात्र सर्वच भाड्याच्या जागेत अथवा समाज मंदीरात भरविल्या जातात. जामनेर शहरात पालीकेच्या घरकुलात व नदी काठावर पत्र्याच्या शेडमध्ये अंगणवाडी भरवीली जाते.
आहारासाठीचे लाखो रुपये जातात कोठे ?
३१ मार्च अखेर पर्यंत तालुक्यातील प्रकल्प १ मध्ये २८ हजार ३२२ व प्रकल्प २ मध्ये ३२ हजार ३९६ टीएचआर पाकीटांचे वितरण केल्याचे संबंधीत प्रकल्प अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. वितरीत दाखविलेल्या पाकीटांची किंमत सुमारे ३५ लाख असावी. या व्यतीरीक्त अंगणवाडीत दिल्या जात असलेल्या पोषण आहारावर होणारा खर्च वेगळाच आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शासन अंगणवाडीतील बालकांवर व कुपोषण निर्मुलनासाठी खर्च करते, तरीही कुपोषीत बालकांची संख्या काही कमी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अंगणवाडीतील बालकांना आहार पुरविण्याची जबाबदारी असलेले महिला बचत गट चालवीणारे राजकीय कार्यकर्त्यांशी संबंधीत असल्याने त्यांच्याबाबत येणाºया तक्रारींकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी खोट्या नोंदी दाखवुन वितरण केल्याचे दाखवीले जात आहे. परिणामी कुपोषीत बालकांच्या संखेत दिवसेंदिवस वाढ होत असून अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षीका यांचेवर दबाव टाकुन पालकांच्या सह्या घेतल्या गेल्याची चर्चा सध्या सुरु आहे. पाकीट वितरण घोटाळ्याची वरीष्ठ स्तरावरुन चौकशीची मागणी होत आहे. दरम्यान, टीएचआर पाकीटांचे वितरण बंद करण्याबाबत न्यायालयाने निर्देश दिल्याची माहिती असुन याबाबत अधिकृत माहिती प्राप्त झाली नसल्याचे सुत्रांनी सांगितले.
तालुक्यातील काही तांडा वस्तीत कुपोषीत बालकांची नोंद केलेल्या सर्वेक्षणातुन आलेली आहे. अशा कुपोषीत बालकांच्या वजन वाढीसाठी त्यांंना आवश्यक सकस आहार दिला जातो. पोषण आहार वितरणात तालुक्यात कोठेही अनियमीतता नाही. कुपोषण निर्मुलनासाठी दुर्गम भागात जनजागृती केली जात आहे.
- ईश्वर गोयर, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जामनेर

Web Title: The number of malnourished children in Jamnar taluka is alarming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.