शहरात रुग्णसंख्या शंभराच्या खालीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:15 AM2021-05-16T04:15:54+5:302021-05-16T04:15:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव कोरोनाचा आलेख घसरत असून, गेल्या आठवडाभरात दिलासादायक चित्र समोर येत आहे. गेल्या दोन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव कोरोनाचा आलेख घसरत असून, गेल्या आठवडाभरात दिलासादायक चित्र समोर येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून रुग्णसंख्या १०० पेक्षा कमी नोंदविली गेली आहे. शनिवारी ६६ नवे कोरेाना बाधित आढळून आले असून, ११२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर चार बाधितांचा मृत्यू झाला आहे.
शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून, ही संख्या आता ११८३ वर पोहोचली आहे. जळगाव ग्रामीणमध्ये २६ रुग्ण आढळून आले असून, १३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहरातील ५८, ६५, ७०, ९१ वर्षीय पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यांसह यावल तालुका दोन, रावेर तालुक्यातील एक ३५ वर्षीय महिला तसेच जामनेर, चाळीसगाव, पाचोरा या तालुक्यातही मृत्यू झाले आहेत.
चाचण्या कमीच
शनिवारी ४१२४ अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. यात ५१६ बाधित आढळून आले आहेत, तर आरटीपीसीआरचे २३१३ अहवाल समोर आले आहेत. यात १०२ बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, आरटीपीसीआरच्या केवळ ७०० चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांची संख्या निम्यांहून घटली आहे.
सक्रिय रुग्ण ९६५३
ऑक्सिजनवरील रुग्ण ९९९
आयसीयूतील रुग्ण ६०६
लक्षणे असलेले रुग्ण २०६२