शहरातील रुग्णसंख्या तीन हजारावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 12:01 PM2020-08-03T12:01:26+5:302020-08-03T12:01:45+5:30
जळगाव : शहरातील सहा बाधितांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे़ एका दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद रविवारी झाली असून शहरातील ...
जळगाव : शहरातील सहा बाधितांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे़ एका दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद रविवारी झाली असून शहरातील मृतांची संख्या ११० वर पोहाचली आहे़ यासह ९२ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्याही वाढून ३००२ झालेली आहे़ यात २११६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे़ दरम्यान, शहरातील टिळक नगर भागात एकाच कुटुंबातील ७ जणांना बाधा झाल्याचे समोर आले आहे़
शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून रुग्ण झपाट्याने समोर येत आहेत़ शहरातील मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रविवारी एकाच दिवशी सहा बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आह़े जिल्ह्यातील सर्वाधिक मृत्यू जळगाव शहरातील झालेले आहेत़
या भागात आढळले रुग्ण
तिलक नगर ७, दौलतनगर २, शाहूनगर २, शिवाजीनगर २़, कासमवाडी, न्यू जोशी कॉलनी, आर्यन कॉलनी, वाघनगर, कांचननगर, रामेश्वर कॉलनी, तळेले कॉलनी, विठ्ठ्लपेठ, अयोध्यानगर, गणेशवाडी, लक्ष्मीनगर, खोटेनगर, महावीरनगर, पिंप्राळा, पोलीस आॅफिस क्वाटर्स, निवृत्तीनगर, प्रतापनगर, गुरूदत्तनगर, गायत्री नगर प्रत्येकी १.
पिंप्राळ्यात लोकप्रतिनिधी बाधित
ंिपंप्राळा येथील लोकप्रतिनिधीलाही कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या आठवड्यात एक तरुण आजारी होता. त्याला दवाखान्यात घेऊन जाण्याचे काम या लोकप्रतिनिधीने केले. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.