रुग्णसंख्येत होतेय वाढ, पण गंभीर रुग्णांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:15 AM2021-05-13T04:15:53+5:302021-05-13T04:15:53+5:30

जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गंभीर रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट येत आहे ही दिलासादायक बाब आहे. तर दुसरीकडे ...

The number of patients increased, but the number of critically ill patients decreased | रुग्णसंख्येत होतेय वाढ, पण गंभीर रुग्णांची संख्या घटली

रुग्णसंख्येत होतेय वाढ, पण गंभीर रुग्णांची संख्या घटली

Next

जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गंभीर रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट येत आहे ही दिलासादायक बाब आहे. तर दुसरीकडे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसून येत आहे. दररोज बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे तर नव्याने पॉझिटिव्ह येणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

कोविडचे उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटर सुरू आहेत. तसेच रुग्णालयातील सामान्य बेडदेखील पूर्वीप्रमाणेच भरलेले आहेत. मात्र दुसरीकडे लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे कृत्रिम ऑक्सिजन, रुग्णालयांमधील ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, आयसीयू बेडदेखील काही प्रमाणात का होईना पण रिकामे होऊ लागले आहेत.

११ मे रोजीची स्थिती

ॲक्टिव्ह रुग्ण ९९०३

लक्षणे असलेले रुग्ण २२४२

आयसीयूत दाखल ६६९

ऑक्सिजनवर असलेले रुग्ण ११६९

१० मे

ॲक्टिव्ह रुग्ण ९८१४

लक्षणे असलेले २३२७

आयसीयूत असलेले ६९२

ऑक्सिजनवर असलेले ११९३

४ मे

ॲक्टिव्ह रुग्ण ९७६८

लक्षणे असलेले रुग्ण २६४३

आयसीयूत दाखल रुग्ण ६५८

ऑक्सिजनवर असलेले १३२४

३ मे

ॲक्टिव्ह रुग्ण १०,०५५

लक्षणे असलेले रुग्ण २६२३

आयसीयूत दाखल रुग्ण ७६३

ऑक्सिजनवर असलेले रुग्ण १३३८

Web Title: The number of patients increased, but the number of critically ill patients decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.