जळगाव जिल्ह्यात आॅक्टोबरपर्यंत रुग्णसंख्या दीड लाखापर्यंत जाणार-डीएचओ पटोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 12:38 AM2020-09-13T00:38:59+5:302020-09-13T00:40:07+5:30
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, आॅक्टोबर महिन्यापर्यंत ही संख्या एक ते दीड लाखापर्यंत जाऊ शकते
भुसावळ : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, आॅक्टोबर महिन्यापर्यंत ही संख्या एक ते दीड लाखापर्यंत जाऊ शकते, असे मत जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप पटोडे यांनी व्यक्त केले आहे. या संसर्गावर उपाय म्हणून लस येणार आहे. मात्र ही लस कधी येईल ते अद्याप सांगता येणार नाही. त्यामुळे कोरोना रोखण्याची जबाबदारी ही सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आवारात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी प्रमोद पांढरे, गटविकास अधिकारी विलास भाटकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, मावळते सरपंच रामलाल बडगुजर परिसरातील शिक्षक, आशा सेविका आदी उपस्थित होते.
८० टक्के लोकांना कोरोना होऊन गेला आहे. प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे या संसर्गाचा त्यांना त्रास जाणवला नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या सर्वत्र नागरिक जबाबदारीने वागत नसल्यामुळे त्यानी नाराजी व्यक्त केली. कुठेही जा विना माक्स, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे त्यांनी अनुभवातून सांगितले. ही सर्व जबाबदारी सामाजिक जबाबदारी असून सर्वांनी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
कुºहे पानाचे गाव बनत आहे ग्रामीण भागाचा 'हॉटस्पॉट '
भुसावळ तालुक्यात कोरोनाने वरणगाव पाठोपाठ खडका, कंडारी, साकरी, वेल्हाळा, मोंढाळा यासह बऱ्याच गावांमध्ये शिरकाव केला होता. कुºहे (पानाचे ) गाव मात्र यापासून दूर होते. ग्रामस्थांनी सुरुवातीला खूप काळजी घेतली. सर्वांनीच संसर्गापासून दूर होत असल्याचे दिसून येते. मात्र गेल्या काही दिवसात वाढत असलेली कोरोनाची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून काळजी घ्यावी व कोरोनाला रोखावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांनी केले. सध्या कुºहे (पानाचे ) येथे रुग्णसंख्या पन्नासपर्यंत पोहोचली असून, दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मी ग्रामस्थांच्या संपर्कात नेहमी आहे. काही अडचण असल्यास मला सांगा. मात्र सर्वांनी कोरोना रोखण्यासाठी पुढे या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.