एकाच दिवसात लक्षणे असणारे ६७३ रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:15 AM2021-04-13T04:15:53+5:302021-04-13T04:15:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात गंभीर रुग्ण वाढत असतानाच अचानक एका दिवसात लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये ६७३ ने वाढ ...

The number of patients with symptoms increased by 673 in a single day | एकाच दिवसात लक्षणे असणारे ६७३ रुग्ण वाढले

एकाच दिवसात लक्षणे असणारे ६७३ रुग्ण वाढले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात गंभीर रुग्ण वाढत असतानाच अचानक एका दिवसात लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये ६७३ ने वाढ नोंदविण्यात आली आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अगदीच झपाट्याने वाढत असल्याने शासकीय व खासगी दोन्ही वैद्यकीय यंत्रणांवर याचा ताण पडत आहे. सोमवारी जळगाव शहरापेक्षा अमळनेरात सर्वाधिक २२० रुग्ण आढळून आले आहेत.

जळगाव शहरात २१३ नवे रुग्ण आढळून आले असून २१० रुग्ण बरे देखील झाले आहे. तीन बाधितांचा मृत्यू झाला असून यात ४५, ८७ वर्षीय पुरूष व ५२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यासह चोपडा तालुक्यात ३, भुसावळ, चाळीसगावात प्रत्येकी २, धरणगाव, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, यावल, रावेर या ठिकाणी प्रत्येकी १ बाधिताचा मृत्यू झाला. सोमवारी ७ हजार ५९४ ॲन्टीजन चाचण्या करण्यात आल्या तर आरटीपीसीआरचे १०१७ अहवाल आले. त्यात २९९ बाधित आढळून आले आहेत.

असे वाढले रुग्ण

जळगाव जिल्ह्यात रविवारी एकूण सक्रिय रुग्णांमध्ये २७८३ रुग्ण ही लक्षणे असलेली होती. मात्र, सोमवारी आलेल्या शासकीय अहवालानुसार हीच संख्या ३४५६ वर पोहोचली होती. नवीन १२०१ रुग्णांमध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ही प्रथमच ५० टक्कयांपेक्षा अधिक नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, अतिदक्षता विभागात जाणाऱ्या रुग्णांची संख्याही ६२६ झाली आहे. तर सोमवारी १४९१ रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत होता.

हे पाच हॉटस्पॉट

अमळनेर : २२०

जळगाव शहर : २१३

भुसाावळ : १२४

रावेर : १२२

चोपडा १०४

Web Title: The number of patients with symptoms increased by 673 in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.