बाधितांचे प्रमाण एकाच दिवसात पाच टक्क्यांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:45 AM2021-02-20T04:45:46+5:302021-02-20T04:45:46+5:30

जळगाव: जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढताच असून शुक्रवारी पुन्हा १५२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात जळगाव शहरात ७९ ...

The number of victims increased by five per cent in a single day | बाधितांचे प्रमाण एकाच दिवसात पाच टक्क्यांनी वाढले

बाधितांचे प्रमाण एकाच दिवसात पाच टक्क्यांनी वाढले

Next

जळगाव: जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढताच असून शुक्रवारी पुन्हा १५२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात जळगाव शहरात ७९ रुग्ण आढळले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी दीडशेपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाल्याने चिंतेत भर पडली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ७८० वर पोहोचली आहे. दरम्यान, शहरात सर्वाधिक रुग्ण समोर येत असून केवळ महापालिकेच्या अहवालांमध्ये बाधितांचे प्रमाण एकाच दिवसात पाच टक्क्यांनी वाढले आहे.

शहरात रुग्णसंख्या वाढत असल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून अचानक तपासणीसाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात गर्दी वाढली आहे. शुक्रवारी शहरात २६७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या तर सुमारे २०० अहवालांमध्ये ५० बाधित आढळून आले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून साधारण शंभर ते दीडशे चाचण्या होत होत्या. मात्र, आता या चाचण्या सरासरी पावणे तीनशे पर्यंत होत आहेत.

शहराला विळखा

शहरातील शिवकॉलनी, मुक्ताईनगर, बालाजी पेठ, रिंग रोड या भागात प्रत्येकी तीन रुग्ण आढळून आले आहेत. तर रामदास कॉलनी २, शनिपेठ २, मोहननगर २, देवेंद्र नगर २, भूषण कॉलनी, अयोध्यानगर, प्रेमनगर, शिवाजी नगर, देवेंद्र नगर, एमआयडीसी, गिरणा टाकीजवळ, टागोर नगर, स्वामी विवेकानंद नगर, गणपती नगर, रामानंद नगर, संचार नगर, बीबा नगर, कांचन नगर, वाघ नगर, अजय कॉलनी, पिंप्राळा, यशवंत नगर, बळीराम पेठ, डीएनसी कॉलेज जवळ, श्रीकृष्ण कॉलनी, सदगुरू नगर, इकरा मेडिकल कॉलेज येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे.

चाचण्या वाढल्या

जिल्ह्यात शुक्रवारी १३०७ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. तर ॲन्टीजन ३७३ झाल्या. यासह ७३० आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल समोर आले. यात ९५ बाधित आढळून आले आहेत. तर ॲन्टीजनमध्ये ५७ बाधित समोर आले आहेत. मात्र, यासह प्रलंबित अहवालांची संख्याही वाढून ८१९ वर पोहोचली आहे.

Web Title: The number of victims increased by five per cent in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.