रेशनसाठी पिशव्या ठेवून लावले जाताहेत नंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 03:36 PM2020-07-29T15:36:58+5:302020-07-29T15:38:35+5:30
येथे शासनाच्या नियमाप्रमाणे स्वस्त धान्य दुकानावर दोन टप्प्यात धान्य वितरीत होत असल्याने लाभार्थी पहाटे पाचपासून नंबर लावत आहेत.
दहिगाव, ता.यावल : येथे शासनाच्या नियमाप्रमाणे स्वस्त धान्य दुकानावर दोन टप्प्यात धान्य वितरीत होत असल्याने लाभार्थी पहाटे पाचपासून नंबर लावत आहेत.
कोरोना महामारीमुळे नागरिकांना पाच किलो मोफत धान्य वाटप होत आहे. यामुळे नियमित स्वस्त धान्य वितरण आणि मोफत धान्य वितरण धान्य दुकानदाराला करावे लागत आहे.
प्रत्येक महिन्याला धान्यपुरवठा अपूर्ण होत असल्याने लाभार्थ्यांना धान्य वितरण पूर्णपणे करता येत नसल्याने धान्य दुकानदारही त्रस्त झालेली आहेत. या प्रकारामुळे आपल्याला धान्य मिळाले तर पाहिजे या हेतूने प्रत्येक लाभार्थी पहाटे पाच वाजेपासून स्वस्त धान्य दुकानात समोर पिशव्या ठेवून नंबर लागत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने धान्य वितरण पूर्णपणे करावे, अशी मागणी लाभार्र्थींनी केली आहे.