परिचारिका दिनापासूनच कंत्राटी परिचारिकांचे मुंबईत आंदोलन, जळगावातील ४० परिचारिका सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:44 PM2018-05-12T12:44:41+5:302018-05-12T12:44:41+5:30
आझाद मैदानावर बेमुदत काम बंद आंदोलन
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १२ - शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊनही नोकरीत कायमस्वरुपी सामावून घेतले जात नसल्याच्या निषेधार्थ १२ मे, परिचारिका दिनापासूनच कंत्राटी परिचारिकांच्यावतीनेमुंबईत आझाद मैदानावर बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्रातून २०१२ ते २०१६ दरम्यान प्रशिक्षण घेतलेल्या परिचारिकांना कायमस्वरुपी नोकरीत न घेता त्यांना ११ महिन्याच्या कंत्राटी पद्धतीने घेतले जाते. त्यानंतर त्यांची सेवा कायम न करता त्यात खंड दिला जातो. त्यामुळे या काळातील परिचारिकांना कायम सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी आहे. त्यासाठी कंत्राटी परिचारिकांनी कामबंद आंदोलन पुकारले असून १२ मे पासून आझाद मैदानावर होणाऱ्या या आंदोलनात जळगाव जिल्हा रुग्णालयातील ३५ ते ४० कंत्राटी परिचारिका सहभागी होणार आहे. यामुळे येथील आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.