परिचारिकेने दिली पती, दीर, सासऱ्याला लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:17 AM2021-01-20T04:17:27+5:302021-01-20T04:17:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाला प्रतिबंधक म्हणून होणारे लसीकरण हे पूर्णत: सुरक्षित आहे... त्याला न घाबरता आरोग्य कर्मचाऱ्यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाला प्रतिबंधक म्हणून होणारे लसीकरण हे पूर्णत: सुरक्षित आहे... त्याला न घाबरता आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, आम्ही आरोग्य सेवेत असलेल्या कुटुंबाने लस घेतली आहे. तुम्हीही घ्या, असे आवाहन एकाच दिवशी पती, दीर, सासरे यांना लस देणाऱ्या अधिपरिचारिका गायत्री योगेश पाटील यांनी केले आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या दिवसाचे हे वैशिष्ट्य ठरले..
गायत्री पाटील या अधिपरिचारिका म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत असून त्यांच्याकडे दुसऱ्या दिवशी लाभार्थ्यांना लस देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांचे पती योगेश पाटील हे एआरटी सेंटरला ब्रदर म्हणून कार्यरत आहेत तर दीर राकेश पाटील स्टोअर किपर आणि सासरे अरुण पाटील हे प्रयोगशाळा सहायक म्हणून कार्यरत आहेत. या तिघांनाही सोमवारी एसएमएस गेले होते. योगायोगाने गायत्री पाटील याच लसीकरणाला होत्या. त्यांच्या हातूनच या तिघांनी लस घेतली. कुटुंबाला लस दिली. आता बुधवारी आपणही लस घेणार असल्याचे योगिता पाटील यांनी सांगितले असून कोरोनापासून बचावावासाठी लस घ्या, घाबरू नका, कोणालाही कसलीही लक्षणे नाहीत, असे त्यांनी 'लोकमत'ला सांगितले.
फोटो आहे..