चाळीसगावातील ‘बेलगंगे’च्या साखरेने नूतन वर्षाचे तोंड गोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 01:18 AM2018-12-31T01:18:49+5:302018-12-31T01:20:00+5:30
१० वर्षानंतर यावर्षी प्रथमच बेलगंगा साखर कारखान्याची चाके फिरल्याने रविवारी उत्पादीत झालेल्या यंदाच्या गाळप हंगामातील साखरेचे पूजन अंबाजी ग्रुपचे संचालक व उद्योगपती प्रवीण पटेल यांच्याहस्ते झाले. यावेळी एकमेकांना साखर भरवून हा सोहळा साजरा झाला.
चाळीसगाव, जि.जळगाव : १० वर्षानंतर यावर्षी प्रथमच बेलगंगा साखर कारखान्याची चाके फिरल्याने रविवारी उत्पादीत झालेल्या यंदाच्या गाळप हंगामातील साखरेचे पूजन अंबाजी ग्रुपचे संचालक व उद्योगपती प्रवीण पटेल यांच्याहस्ते झाले. यावेळी एकमेकांना साखर भरवून हा सोहळा साजरा झाला. भूमीपुत्रांनी मोठ्या नेटाने कारखाना सुरू करुन चाळीसगावकरांना नूतन वर्षाची गोड भेट दिल्याची प्रतिक्रिया चेअरमन चित्रसेन पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
१० वर्षे बंद असलेला बेलगंगा साखर कारखाना भूमीपुत्रांनी एकत्र येऊन लोकसहभागातून विकत घेतला. ७ रोजी गव्हाणीत ऊस मोळी टाकण्याचा शुभारंभ माजी मंत्री एकनाथराव खडसे, सुरेशदादा जैन, डॉ.रणजीत पाटील, डॉ.सतीष पाटील, गुलाबराव पाटील, शिरीष चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.
ट्रायल सीझनमधील पहिल्या साखरेचे यशस्वी उत्पादन रविवारी हाती आले. ऊसाच्या रसापासून साखर होण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने संचालक मंडळासह कर्मचाºयांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी अंबाजी ग्रुपचे संचालक दिलीप चौधरी, प्रेमचंद खिंवसरा, विजय अग्रवाल, दिनेश पटेल, किरण देशमुख, रवींद्र केदारसिंग पाटील, नीलेश निकम, डॉ.अभिजीत पाटील, सुशील जैन, अजय शुक्ल, विनायक वाघ, उद्धवराव महाजन, अशोक ब्राम्हणकार, राजेंद्र धामणे आदी उपस्थित होते.
गाळप हंगामाला दीड महिना उशिराने सुरुवात झाल्याने यंदाचा हा ट्रायल सीझन आहे. १० वर्षानंतर पहिल्यांदाच साखरेचे यशस्वी उत्पादन झाले याचा आनंद आहे. पुढील हंगाम वेळेवर सुरु होईल.
- चित्रसेन पाटील, चेअरमन, बेलगंगा साखर कारखाना, चाळीसगाव