पोषण आहारावर चोरट्यांचा डल्ला

By admin | Published: January 21, 2017 12:36 AM2017-01-21T00:36:07+5:302017-01-21T00:36:07+5:30

पाळधी जि.प.शाळेतील घटना : वाकोदलाही शेतात चोरी

Nutritionist thieves | पोषण आहारावर चोरट्यांचा डल्ला

पोषण आहारावर चोरट्यांचा डल्ला

Next

पाळधी/वाकोद, ता.जामनेर : येथील जि.प.च्या प्राथमिक शाळेत  चोरी झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. चोरट्यांनी शालेय पोषण आहारातील तांदूळ ५० किलो, मूगदाळ ४ किलो, हळद १ किलो, मिरची पावडर २ किलो ५०० ग्रॅम, तेल २८ किलो, मीठ २६ किलो यासह शालेय साहित्यातील दोन अ‍ॅम्प्लिफायर व स्पीकर इत्यादी साहित्यही लंपास केले आहे़ तर वाकोद येथील चौण्डेश्वर शिवारातील एका शेतकºयाची दुसºयांदा इलेक्ट्रिक मोटार व इतर साहित्याची चोरी करण्याची घटना घडली़ त्यामुळे हा शेतकरी हवालदिल झाला आहे़
पाळधी येथे सकाळी शाळेचा दरवाजा उघडा दिसल्यानंतर मुख्याध्यापक प्रतापसिंग परदेशी यांनी तत्काळ शाळेत पाहणी केली. या वेळी कार्यालयातील रेकॉर्ड ठेवलेल्या खोलीमधील शालेय पोषण आहारांचे साहित्य चोरी झाल्याचे दिसले.
यासह शाळेतील अ‍ॅम्प्लिफायर, स्पीकर, माईक, रेडिओ, स्टॅबिलायझरदेखील चोरी झाल्याचे आढळल्यानंतर त्यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्ष व पदाधिकाºयांशी संपर्क साधून माहिती दिली.
चोरट्यांनी शाळेच्या एका खोलीच्या दरवाजाची कडी तोडून साहित्य लांबविल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे. यानंतर सरपंच, ग्रा.पं. सदस्य व पालकांनीही  शाळेकडे धाव घेत चौकशी केली.
या वेळी सरपंच कमलाकर पाटील, जि.प. सदस्य समाधान पाटील, गटशिक्षणाधिकारी ए.बी. वाडकर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवतराज कुमावत आदी उपस्थित होते.
पहूर पोलीस स्थानकाच्या दोन कर्मचाºयांनीही शाळेत येऊन पाहणी केली.
या प्रकाराबाबत गावात उलटसुलट चर्चा सुरू झाली असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वर्गामधून चोरी गेलेल्या धान्यासह सुमारे ३० ते ४० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरट्याने लांबवल्याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नितीन सपकाळे करीत आहेत.
          (वार्ताहर)
दुसºयांदा शेतात चोरी
४वाकोद, ता़ जामनेर येथील चौण्डेश्वर शिवारातील रामचंद दौलत साळवे यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी शेतातील इलेक्ट्रिक मोटर, स्टार्टर, मेन स्विच, वायर, तसेच आठ पी.व्ही.सी. पाइपांची चोरी केल्याची घटना बुधवार रोजी रात्रीच्या सुमारास घडली़ यात शेतकºयाचे सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे़ तसेच यापूर्वीदेखील त्यांच्या शेतातून इलेक्ट्रिक मोटर व वायरची चोरी झाली होती़ चोरीची ही या शेतातील दुसरी घटना असून वाकोदसह परिसरात दिवसेंदिवस शेतातील चोºयांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे़ यामुळे पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे़ याबाबत रामचंद्र साळवे यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे़ वाढत्या चोºयांचे प्रमाण लक्षात घेता पहूर पोलिसांनी तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकºयांमधून होत आहे

Web Title: Nutritionist thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.