ओबीसी मुख्यमंत्री व बहुजनांचे सरकार ही काळाची गरज- मुक्ताईनगर येथे पत्रकार परिषदेत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 06:56 PM2018-11-11T18:56:19+5:302018-11-11T18:57:53+5:30

महाराष्ट्रात ५२ टक्के ओबीसी समुदाय असतानादेखील आजपर्यंत एकही मुख्यमंत्री हा ओबीसींचा झालेला नाही. त्यामुळे ५२ टक्के समाजाचा ओबीसी मुख्यमंत्री व्हावा आणि बहुजनांचे सरकार महाराष्ट्रात यावा, अशी मागणी लोकजागर अभियानाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांनी रविवारी मुक्ताईनगर येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत केली.

OBC chief minister and Bahujan government need time - at a press conference at Muktainagar | ओबीसी मुख्यमंत्री व बहुजनांचे सरकार ही काळाची गरज- मुक्ताईनगर येथे पत्रकार परिषदेत माहिती

ओबीसी मुख्यमंत्री व बहुजनांचे सरकार ही काळाची गरज- मुक्ताईनगर येथे पत्रकार परिषदेत माहिती

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रात ५२ टक्के ओबीसी समाज असून, आतापर्यंत एकही मुख्यमंत्री झाला नाही.नोकºयांमध्ये ओबीसींचा मोठा अनुशेषओबीसींवर अनेक वर्षांपासून अन्याय

मुक्ताईनगर, जि.जळगाव : महाराष्ट्रात ५२ टक्के ओबीसी समुदाय असतानादेखील आजपर्यंत एकही मुख्यमंत्री हा ओबीसींचा झालेला नाही. त्यामुळे ५२ टक्के समाजाचा ओबीसी मुख्यमंत्री व्हावा आणि बहुजनांचे सरकार महाराष्ट्रात यावा, अशी मागणी लोकजागर अभियानाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांनी रविवारी मुक्ताईनगर येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत केली.
याप्रसंगी वाकुडकर यांच्यासोबत लोकजागरचे संयोजक बाबासाहेब भोयर, गोविंद पाटील, शिवचरण उज्जैनकर, धनंजय सापधरे, नितीन भोंबे, प्रमोद पिवटे, जयवंत बोदडे, रा.का.ढोले, प्रवीण बडगुजर, विजय शुरपाटणे, गणेश बुडूकले तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रात ५२ टक्के ओबीसी समाज असून, आतापर्यंत एकही मुख्यमंत्री झाला नाही. तसेच आरक्षणदेखील त्यांना केवळ १६ टक्के मिळत आहे. नोकऱ्यांमध्ये ओबीसींचा मोठा अनुशेष असून, ओबीसींचे लचके तोडले जात असल्याचा आरोप वाकुडकर यांनी केला. त्यासाठी विदर्भव्यापी लोकजागर यात्रा काढण्यात येत आहे. झिरो बजेट लोकशाही, गाव तिथे उद्योग, कृषी धर्म व कृषी संस्कृती, सामाजिक उद्योग, सामाजिक सरकार, मोफत शिक्षण, मोफत आरोग्य, एक गाव एक परिवार, युवा भारत नवा भारत, गतिशील न्यायालय व पारदर्शी न्याय या आठ विषयांवर महाराष्ट्र व्यापी यात्रेची वाकुडकर यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली.




 

Web Title: OBC chief minister and Bahujan government need time - at a press conference at Muktainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.