ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:39 PM2019-02-15T12:39:32+5:302019-02-15T12:39:57+5:30

ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू झाला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते माजी खासदार अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

OBC-Maratha hidden conflicts continue | ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू

ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू

Next
ठळक मुद्देमनुवादी संविधान आणण्याचा आरएसएसचा डाव

जळगाव : ओबीसींना मिळालेले आरक्षण व फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले सामाजिक व शैक्षणिक मागासले- पणासाठीचे १६ टक्के आरक्षण यांचा पाया एकच असून त्या दोन्ही आरक्षणांसाठी वेगळे जात प्रमाणपत्र देण्याची तरतूदही शासनाने केलेली नाही. त्यामुळे ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू झाला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते माजी खासदार अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुक्ताईनगर वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन मेळाव्यासाठी जाण्यापूर्वी गुरूवारी, १४ रोजी सकाळी ११ वाजता अ‍ॅड.आंबेडकर यांनी अजिंठा विश्रामगृहात यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, ज्येष्ठ सल्लागार व माजी मंत्री डॉ.दशरथ भांडे, जिल्हा निरीक्षक शरद वसतकर, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष भारत ससाणे, एमआयएमचे अध्यक्ष जिया बागवान, महानगराध्यक्ष रेयान जहागीरदार, विवेक ठाकरे उपस्थित होते. अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, ओबीसींना मंडल आयोगाकडून मिळालेले २७ टक्के आरक्षण व त्यासोबच फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण यांचा मूळ आधार सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणच आहे. या आधारावर जे जात प्रमाणपत्र आहे ते एकच असेल. त्यामुळे ओबीसींना आपले २७ टक्के आरक्षण धोक्यात आल्याची भिती वाटत आहे. कुणी मराठा पुढाऱ्याने पुढाकार घेऊन मंडल आयोगाचे आरक्षण तर फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण ‘ब’ असे स्वतंत्र करून जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न केल्यास भांडण मिटेल.
भाजपाला फटकाच बसणार
वंचीत बहुजन आघाडीमुळे भाजपाला फायदा होईल, अशी चर्चा केली जात आहे. त्याबाबत विचारणा केली असता अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, ओबीसींनी आतापर्यंत भाजपाला मतदान केले. तो काँग्रेसचा बेस नाही, मराठा समाज राष्टÑवादी व काँग्रेसकडे आहे.
आरएसएसबाबत आराखडा द्यावा
२०२४ मध्ये संविधान बदलविण्याची भाषा करणाºया राष्टÑीय स्वयंसेवक संघाकडून सुरू आहे. मात्र संविधान का बदलणार याबाबत वक्तव्य नाही. तरीही त्यांचे जे लिखाण दिसते आहे त्यावरून त्यांना मनुवादी संविधान देशात आणायचे आहे.
राष्टÑवादी कॉँग्रेसवर टीका
यावेळी आंबेडकर यांनी राष्टÑवादी कॉग्रेसवरही टीका केली. या पक्षाचे राजकारण ‘अवसरवादी’ असल्याची टीकाही त्यांनी केली.

ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू
प्रकाश आंबेडकर : मनुवादी संविधान आणण्याचा आरएसएसचा डाव

Web Title: OBC-Maratha hidden conflicts continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.