नशिराबादला ओबीसी आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:28+5:302021-07-19T04:12:28+5:30
ओबीसी आरक्षणाबाबत एकत्र घेऊन लढा देण्याचा निर्धार नशिराबाद : येथे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ओबीसी आरक्षण याविषयी जनजागृती ...
ओबीसी आरक्षणाबाबत एकत्र घेऊन लढा देण्याचा निर्धार
नशिराबाद : येथे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ओबीसी आरक्षण याविषयी जनजागृती व माहिती देण्यासंदर्भात न्यू इंग्लिश स्कूलच्या वीर सावरकर सभागृहात बैठक घेण्यात आली. ओबीसी आरक्षणासंदर्भात एकत्र येऊन लढा देण्याचा निर्धार याप्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी नशिराबाद शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष जनार्दन माळी होते. बैठकीला महात्मा फुले समता परिषदेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, ॲड प्रतीक कर्डक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, अनिल नडे, माजी सरपंच विकास पाटील, नितीन शेलार, माळी महासंघ जळगावचे अध्यक्ष वसंत पाटील, सचिन महाजन, प्रकाश माळी, परेश माळी, नशिराबाद सावता माळी ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. सुनीलशास्त्री महाराज, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, ललित बऱ्हाटे, आदी उपस्थित होते. आरक्षण व सध्याची परिस्थिती या विषयावर बाळासाहेब कर्डक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर आरक्षणासंदर्भातील कायदेशीर बाबींवर ॲड. प्रतीक कर्डक यांनी मनोगत व्यक्त केले. राजू पाचपांडे यांनी प्रास्ताविक केले, तर वसंत पाटील यांनी आभार मानले.