ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादींवर ७ डिसेंबरपर्यंत घेता येणार हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:26 AM2020-12-05T04:26:35+5:302020-12-05T04:26:35+5:30

जिल्ह्यातील एप्रिल २०२० ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम कोरोनामुळे आहे तेथेच थांबविण्याचे आदेश राज्य ...

Objections can be taken on Gram Panchayat election voter lists till December 7 | ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादींवर ७ डिसेंबरपर्यंत घेता येणार हरकती

ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादींवर ७ डिसेंबरपर्यंत घेता येणार हरकती

Next

जिल्ह्यातील एप्रिल २०२० ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम कोरोनामुळे आहे तेथेच थांबविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. आता निवडणुकांसाठी हालचाली सुरू असल्याने जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. जून २०२० पर्यंत सोबतच जुलै ते डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्यादेखील निवडणुका होणार आहेत.

यासाठी मतदार यादी कार्यक्रम घोषित करण्यात आला असून १ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान हरकती व सूचना दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात याद्या उपलब्ध आहेत.

Web Title: Objections can be taken on Gram Panchayat election voter lists till December 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.