आकाश निरीक्षणातून चिमुकल्यांनी घेतली ग्रह, ताऱ्यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 08:32 PM2019-12-02T20:32:55+5:302019-12-02T20:33:11+5:30
जळगाव - वाघनगर येथील विवेकानंद प्राथमिक शाळामध्ये आकाश निरीक्षण कार्यशाळातंर्गत विद्यार्थ्यांना चंद्र व तारे पाहण्याचा आनंद लुटला़ त्याचबरोबर ८८ ...
जळगाव- वाघनगर येथील विवेकानंद प्राथमिक शाळामध्ये आकाश निरीक्षण कार्यशाळातंर्गत विद्यार्थ्यांना चंद्र व तारे पाहण्याचा आनंद लुटला़ त्याचबरोबर ८८ तारकासमूह २७ नक्षत्र त्यांचे आकार आणि पृथ्वी ज्या बारा राशीतून फिरतो त्या बारा राशींची माहितीही जाणून घेतली.
३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यानात ‘आकाश निरीक्षण’ कार्यशाळा घेण्यात आली़ अवकाशी माहिती जाणून घेण्यासह चंद्र व तारे पाहण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांची पालकांसह गर्दी झालेली होती़ कार्यशाळेमध्ये मराठी विज्ञान परीषदेचे सदस्य मोहन कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ त्यावेळी त्यांनी अवकाश ही संकल्पना अतिशय सोप्या शब्दात विद्यार्थ्यांना समजवून सांगितली़ पृथ्वीवरून अवकाशातील दिशांचे ज्ञान, धु्रव ताºयाची स्थिती, हिवाळा आणि उन्हाळा ऋतूमध्ये ाअसणाºया आकाशातील चांदण्यांची स्थिती, आकाश निरीक्षणाच्या पद्धतीची माहिती दिली़ त्यानंतर टेलीस्कोपचे विविध प्रकार, सूर्यमाला व आकाशगंगेचे स्वरूप, भारतीय खगोल वैज्ञानिकांची ओळख, नक्षत्र व तारे यांची सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी टेलीस्कोपद्वारे चंद्र व तारे पाहण्याचा अनुभव घेतला़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाल नेटके व दिव्या राठोड यांनी केले.
यांचा होता सहभाग
आकाश निरीक्षण कार्यशाळेमध्ये पक्षी मित्र उमेश इंगळे यांच्यासह मुख्याधपक हेमराज पाटील, वैशाली पाटील, सचिन गायकवाड, आकाश शिंगाणे, जयश्री वंडोळे यांच्यासह पालकांचाही सहभाग होता.