शासकीय कामात अडथळा; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:21 AM2021-08-22T04:21:34+5:302021-08-22T04:21:34+5:30
भुसावळ : शासकीय कामात अडथळा, शिवीगाळ प्रकरणी भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहन चालकाविरोधात गुन्हा ...
भुसावळ : शासकीय कामात अडथळा, शिवीगाळ प्रकरणी भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुंडलिक दगडू सूर्यवंशी (५२, रा.हिरानगर, भुसावळ) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. तक्रारदार तथा शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी दिनेश पाटील हे शनिवारी सकाळी नऊ वाजता नाहाटा महाविद्यालयाजवळील चौफुलीजवळ कर्तव्यावर असताना संशयित आरोपी सूर्यवंशी हे प्लॅटिना एमएच १९ डीएस.१३०९ दुचाकी येत असताना त्यांना थांबवण्यात आले. लायसन्सची विचारणा केली असता त्यांनी लायसन्स दाखवले मात्र त्याची मुदत संपल्याचे लक्षात आल्याने कर्मचारी पाटील यांनी त्याबाबत २०० रुपये दंडाची पावती दिली. याचा सूर्यवंशी यांना राग आला त्यांनी पोलीस कर्मचारी दिनेश पाटील, प्रदीप पाटील यांना शिवीगाळ करुन अंगावर धावून येऊन धक्काबुक्की करुन धमकावले व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करीत गोंधळ निर्माण केला.
याप्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीनुसार सूर्यवंशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बाजारपेठ पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
याबाबत दिनेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलिसात गु.र.नं. ३६०/ २१, भा.दं.वि. ३५३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश धुमाळ तपास करीत आहेत.