अग्रवाल चौकात भुयारी मार्गाला विद्युत तारांचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:20 AM2021-06-09T04:20:04+5:302021-06-09T04:20:04+5:30
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणात अग्रवाल चौकात भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. तेथे आता ...
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणात अग्रवाल चौकात भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. तेथे आता विद्युत तारांचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे हे काम थांबले आहे. शनिवारी या परिसरात वीज बंद करून हे काम केले जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा यांनी दिली.
अग्रवाल चौकात भुयारी मार्गाच्या कामाला काही दिवस आधी सुरूवात करण्यात आली होती. तेथे बऱ्यापैकी काम करण्यात आले आहे. मात्र तेथे पाईपच्या बाजुला तीन उच्च क्षमतेच्या तारा आहेत. या तारा काढून टाकल्याशिवाय हे काम पुढे सरकवणे शक्य नाही. त्यामुळे या तारा काढण्याचे काम शनिवारी केले जाणार आहे.
अग्रवाल चौकातील या भुयारी मार्गातून दुचाकी आणि चारचाकीला रस्ता ओलांडणे सोपे जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे जोरात काम सुरू होते. मात्र या तारांचा अडथळा आल्याने हे काम सध्या थांबवण्यात आले आहे.