जामनेर तालुका शिक्षण संस्थेच्या चौघांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 07:14 PM2017-08-10T19:14:58+5:302017-08-10T19:17:14+5:30
दस्तऐवजात फेरफार करीत कामकाजात आणला अडथळा
ऑनलाईन लोकमत
जामनेर,दि.10 - न्यू.इंग्लिश स्कूलच्या दस्तऐवजात फेरफार करीत कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी जामनेर तालुका शिक्षण संस्थेचे सहसचिवासह चौघांविरूद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यवेक्षक बी.आर.चौधरी यांनी मंगळवारी पोलिसांकडे सहसचिव पारस ललवाणी, शिक्षक मनोज मेश्राम, दुर्गा माळी, लिपीक अनिल सैतवाल यांचेविरुध्द तक्रार दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, ललवाणी यांनी बळजबरीने सैतवाल यांचेकडून मेश्राम व माळी यांची नावे शाळेच्या मष्टरवर लिहून घेत 15 जून ते 8 ऑगस्ट 17 या दरम्यान सह्या करून घेतल्या. या दस्तऐवजात फेरफार करुन मस्टरच्या या भागाचे मोबाईल मध्ये फोटो काढुन खोटे पुरावे तयार करीत कामकाजात अडथळा आणल्याचे म्हटले आहे. या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक नजीर शेख यांनी फत्तेपुर व जामनेर शाळेत जावुन चौकशी केली. त्यानंतर भादवी कलम 466, 353, 120 , 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. सैतवाल यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.