अधिकारी - पदाधिकाऱ्यांच्या वादात अडकला शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:45 PM2019-09-06T12:45:45+5:302019-09-06T12:46:12+5:30

पालकमंत्र्यांना वेळ नसल्याचे कारण

Officers - Teacher award caught in the controversy of office bearers | अधिकारी - पदाधिकाऱ्यांच्या वादात अडकला शिक्षक पुरस्कार

अधिकारी - पदाधिकाऱ्यांच्या वादात अडकला शिक्षक पुरस्कार

Next

जळगाव : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याचा मुहूर्त टळला़ या यादीत नेमकी कुणाची नावे याबाबतची उत्सुकता असताना ही यादी आता बंद लिफाफ्यात आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांची वेळ मिळाल्यानंतर हा लिफाफा उघडला जाईल, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी म्हटले आहे़
शिक्षक दिनी दिल्या जाणाºया पुरस्कारात राजकीय हस्तक्षेप वाढल्याच्या तक्रारी होत आहेत़ यंदाही काही निकषात न बसणाºया शिक्षकांसाठी पदाधिकाऱ्यांनी अधिकाºयांकडे आग्रह केला मात्र, जे नियमात बसत नाहीत त्यांना पुरस्कार कसा देणार, अशी भूमिका अधिकाºयांनी घेतल्यामुळे शिक्षक दिन उजाडूनही यादीचा घोळ मिटत नव्हता, ४ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली होती़ मात्र हे तांत्रिक कारण काय? याबाबत स्पष्टता नसल्याने आरोप सुरू झाले आहेत़ आता काही शिक्षकांकडून पुरस्कारांसाठी समितीने थेट शाळांवर पाहणी करावी व मगच पुरस्कार द्यावे, असा सूर उमटत आहे़
कार्यक्रमाची तारीख निश्चित नाही
पालकमंत्री गिरीश महाजन यांना वेळ नसल्याने कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे पदाधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे़ त्यांच्या वेळेनुसार लवकरच हा कार्यक्रम होईल, असेही सांगितले जात आहे़ मात्र, प्रत्यक्षात यादीत नावे टाकण्याचा काही पदाधिकाºयांच्या आग्रहामुळे यादी लांबल्याने कार्यक्रमाच्या वेळेवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे़
दोन पदाधिकारी भिडले, ठरावाची एैसीतैसी
शिक्षक पुरस्काराच्या प्रस्तावातील नावावरून तीन ते चार दिवसांपूर्वी दोन पदाधिकाºयांमध्ये खडाजंगी झाली होती़ शिवाय गणवेश घोटाळ्यातील आरोप असलेल्या शिक्षकांच्या प्रस्तावामुळेही मोठे वादळ निर्माण झाले होते़ सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी दोन शिक्षकांचे प्रस्ताव फेटाळले होते़ दरम्यान, गुणवत्तेच्या आधारावरच हा पुरस्कार दिला जावा असा ठराव शिक्षण समितीच्या सभेत करण्यात आला होता़ मात्र, यादीतील घोळामुळे होणारे आरोप बघता या ठरावाची एैसीतैसी झाल्याचे बोलले जात आहे़

Web Title: Officers - Teacher award caught in the controversy of office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव