अधिका:यांसोबत संबंध गैर नव्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2017 12:20 AM2017-03-28T00:20:45+5:302017-03-28T00:20:45+5:30
गिरीश महाजन : नोटाबदली प्रकरणात संशयितांविषयी भूमिका
जळगाव : लोकप्रतिनिधी या नात्याने अधिकारी व कर्मचा:यांशी संपर्क व संबंध असतात. त्यांच्याशी संबंध असणे गैर नाही, अशी भूमिका जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नोटाबदली प्रकरणी चौकशी झालेल्या अधिका:यांशी राजकीय मंडळींच्या संबंधांविषयी बोलताना स्पष्ट केली. नोटाबदलीप्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.
संपर्क कार्यालयात महाजन यांनी सोमवारी पत्रकारांनी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहरातील विकास कामांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र अजून 100 कोटींच्या निधीची मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.25 कोटींच्या निधीमध्ये होणा:या कामांसंदर्भात जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक घेणार आहे. जळगाव शहरात अमृत योजनेंतर्गत काम होणार आहे. त्यावेळी पाईप लाईनसाठी खोदकाम होईल, त्यामुळे अमृत योजनेचे काम केल्यानंतर रस्त्याचे काम करावे का? असा दुसरा मतप्रवाह समोर येत आहे.
अधिका:यांशी संबंध गैर नाही
चोपडा येथील जिल्हा बँकेच्या शाखेतून जुन्या नोटा बदल केल्याप्रकरणी सीबीआयने जि.प.चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदू वाणी यांची चौकशी केली आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी नंदू वाणी यांचे कुणासोबत संबंध आहे हे जगजाहीर असल्याचे विधान केले होते, याबाबत विचारले असता, त्यांनी अधिकारी यांच्यासोबत संबंध असणे गैर नसल्याचे स्पष्ट केले. लोकप्रतिनिधी म्हणून अनेक अधिकारी व कर्मचा:यांशी संबंध येत असतात. सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे चौकशी नंतर खरा प्रकार काय आहे, ते समोर येणारच आहे. ज्याने चूक केली आहे त्याला शिक्षा झालीच पाहीजे असे परखड मत त्यांनी नोटबदली प्रकरणाबाबत व्यक्त केले.भादली हत्याकांडाविषयी आजच आपण पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतल्याचेही ते म्हणाले.
काय माहिती हवीय सीबीआयला?
सीबीआयने वाणी, पवार, सूर्यवंशी व तायडे हे सेवेत कधी रूजू झाले, त्यांचा हुद्दा, कामाचे स्वरुप, कामाचे तास, रजा केव्हा घेतल्या व इतर माहिती विचारली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर संबंधित अधिकारी व कर्मचारी किती दिवस सुट्टीवर होते, नेमक्या याच दरम्यान त्यांनी सुट्टय़ा घेतल्या का, याबाबतची माहिती सीबीआयला हवी असल्याचे कळते.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जिल्हा परिषद प्रशासनाकडून जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेत नोटाबदली केल्याच्या प्रकरणात चौकशी झालेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी, शाखा अभियंता नंदकुमार पवार, कक्ष अधिकारी सुनील सूर्यवंशी व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक भूषण तायडे यांची आस्थापनाविषयक माहिती मागितली आहे. या वृत्तास जि.प.तील वरिष्ठांनी दुजोरा दिला. सीबीआयने मागितलेली सर्व माहिती जि.प.ने तयार करून ठेवली आहे. ही माहिती कुठे आणि कधी पोहोचवायची याची सूचना सीबीआयने दिलेली नसली तरी सीबीआयकडून फोनद्वारे या माहितीसंबंधी सूचना दिली गेल्यानंतर ती तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचना सीबीआयच्या अधिका:यांनी जि.प.प्रशासनाला दिल्या आहेत. माहितीची सविस्तर फाईल वरिष्ठ अधिका:याकडे आहे.