सभापतींसह पदाधिका:यांचे बोदवडला आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2017 05:28 PM2017-06-24T17:28:54+5:302017-06-24T17:28:54+5:30
सीईओंकडून अपमानास्पद वागणुकीचे पडसाद : पाणी समस्या कायम
Next
ऑनलाईन लोकमत
बोदवड,दि.24 : ओडीएचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जि.प.चे सीईओ यांच्याकडे गेले असताना त्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याच्या घटनेचे बोदवडमध्ये पडसाद उमटत असून पं.स.सभापतींसह पदाधिका:यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान, ओडीएचा पाणी प्रश्न अद्यापही तसाच पडून आहे. चार कोटी थकित वीज बिल न भरल्याने पाणी पुरवठा ठप्प आहे.
बोदवड तालुक्यातील 51 गावांचा पाणीप्रश्न मिटवण्याची मागणी संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे मागणी करण्यासाठी बोदवड पंचायत समितीचे सभापती गणेश पाटील हे बैठकीत गेले असता ‘तुम्ही बाहेर निघा, मी तुमच्या कामासाठी आलेली नाही’ असे सांगून अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ बोदवड तालुक्यातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शनिवार 24 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात सुमारे 60 कार्यकर्ते पदाधिकारी असून त्यात पंचायत समिती सभापती गणेश पाटील, बाजार समिती संचालक रामदास पाटील, दुध संघ संचालक मधुकर राणे, नगरसेवक कैलास चौधरी, बाजार समिती संचालक अनिल वराडे, पंचायत समिती सदस्य किशोर गायकवाड, भाजप तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, किरण वंजारी, दिलीप घुले, दीपक वाणी, पुरूषोत्तम पाटील, कडू माळी, जीवन राणे आदींचा समावेश असून जोर्पयत मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी टंचाई निवारण्याचे ठोस आश्वासन देत नाही तोर्पयत आमरण उपोषण सुरूच राहिल असे उपोषणकत्र्यानी सांगितले आहे.