अधिकाऱ्यांच्या सायकलफेरीने फुटले जळगावातील शिक्षण विभागाचे बिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:24 PM2019-04-09T12:24:56+5:302019-04-09T12:28:19+5:30
धानोरा बुद्रुक येथे कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी गुरूजी वेळेपूर्वीच हजर
जळगाव : एकीकडे पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या काही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर दुसरीकडे विद्यार्थी शाळेत येऊनही शिक्षकांचा पत्ता नसल्याचा प्रकार धानोरा बुद्रुक ता. जळगाव येथे बुधवारी घडला. जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील हे सायकलिंग करीत धानोरा रस्त्याने चालले होते. त्यावेळी त्यांना हा प्रकार दिसला आणि त्यांच्या एका मोबाईल संदेशनाने जि.प. शिक्षण विभागाचे बिंग फुटले आणि यंत्रणा हलली.
या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या इतर शाळांची परिस्थिती काय असणार? प्राथमिक शिक्षणाधिकारी व संबंधित गटशिक्षणाधिकारी शाळांना भेटी देतात की नाही? यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
नियोजन अधिकारी पाटील हे रोज सकाळी पंधरा ते वीस किलोमीटरपर्यंत सायकलींग करतात़ ३ एप्रिल रोजी ते धानोरा बुद्रुक गावाकडे सायकलीने जात होते. त्यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शाळेबाहेर उभे तर शाळा खोल्या बंद असल्याचे त्यांना आढळून आले.
गुरूजी देखील सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शाळेत पोहचलेले नव्हते. एक जागरुक नागरिक म्हणून त्यांनी बाहेर उभे असलेले विद्यार्थी आणि बंद शाळेचा फोटो त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़एऩपाटील यांना व्हॉटस्अॅप संदेशाद्वारे कळविला.
सीईओंनी या तक्रारीची लागलीच दखल घेतली आणि गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना शाळेला भेट देण्यास सांगितले़ चव्हाण ह्या शाळेत पोहचल्या त्यावेळपर्यंत शाळा बंद असल्याचे आढळून आले. या प्रकाराची त्यांनी सीईओंना माहिती दिली. आणि धानोरा बुद्रुक शाळेचे केंद्रप्रमुख, शिक्षकांसह एक महिन्याचे वेतन कपात आणि एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले.
अऩ़्ग़ुरूजी वेळेच्या आतच हजर
दुसºया दिवशी सकाळी ७़३० वाजता पाटील यांनी सायकलींग करीत धानोरा बुद्रुक येथे पोहचले. त्यावेळी शाळेतील गुरूजी वेळेच्या आधीच शाळेत हजर झालेले आढळून आले. पाटील यांनी पुन्हा शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत फोटो काढला आणि सायकलींग करीत ते पुढे मार्गस्थ झाले.
पाटील हे सायकलींग करीत असताना त्या मार्गावर असलेल्या गावातील शाळांना भेटी देऊन विद्याथी व शिक्षकांना प्रोत्साहन देत असतात.
खरचं होते का पाहणी?
शाळेसह विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी एकीकडे शासनाकडून प्रयत्न सुरू असताना गुरूजीच वेळेवर येत नसतील तर विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यावे़ यातच शाळा सुरू आहे की, नाही़ पटसंख्या किती आहे, विद्यार्थ्यांच्या सुविधा आदींबाबत केंद्रप्रमुखासह गटशिक्षणाधिकारी यांच्यावर जबाबदारी असते़ केंद्रप्रमुखाने आठवड्यातून एकदा तर विस्तार अधिकाºयाने पंधरा ते महिनाभरातून शाळेला भेट देणे बंधनकारक आहे़ परंतु, अधिकाऱ्यांकडून शाळांना भेटी दिल्या जातात का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे़
७़१५ वाजता राहणार हजऱ़़
जिल्हा नियोजन अधिकाºयांनी बिंग फोडल्यानंतर शिक्षण विभागाला आता जाग आली. गटशिक्षणाधिकाºयांनी सोमवारी तालुक्यातील विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांची बैठक घेतली़ यावेळी विस्तार अधिकारी, विषय तज्ज्ञ आणि केंद्रप्रमुखांनी सकाळी ७़१५ ते ७़३० दरम्यानात शाळांना भेटी देऊन उपस्थितीचा अहवाल द्यावा अशा सूचना देण्यात आल्या़ याशिवाय दुपारी उशिरा येणाºया शिक्षकांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे़
मी सुध्दा जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण घेतले आहे़ विद्यार्थ्यांचा भविष्य घडविणे हे गुरूजींचे कार्य आहे़ त्यामुळे त्यांनी वेळेवर येणे आवश्यक आहे़ एक जागरुक नागरिक म्हणून घडलेला प्रकार सीईओ यांना कळविला़ नोटीस किंवा तंबी देण्यात येईल, असे वाटले होते़ मात्र, कारवाई झाली़
-प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी
धानोरा बुद्रुक येथील उशिरा येणाºया शिक्षक, केंद्र्रप्रमुखावर कार्यवाही करण्यात आली आहे़ पुन्हा असा प्रकार कुठल्याही शाळेत आढळून आल्यास त्यांना देखील नोटीस देऊन कार्यवाही करण्यात येईल़
- बी़जे़पाटील़ प्राथमिक शिक्षणाधिकारी.