निम येथे अधिकारी, ग्रामस्थांनी केले चार तास श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 01:04 PM2019-05-02T13:04:33+5:302019-05-02T13:05:06+5:30

दुष्काळाशी करू दोन हात

Officials at Nim, the villagers did the four-hour workshops | निम येथे अधिकारी, ग्रामस्थांनी केले चार तास श्रमदान

निम येथे अधिकारी, ग्रामस्थांनी केले चार तास श्रमदान

Next

कळमसरे ता.अमळनेर : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून निम येथील पाणी फाऊंडेशनने आयोजिलेल्या महाश्रमदानास दुष्काळाशी करू दोन हात म्हणत तालुकाभरातून अधिकारी, विविध सामाजिक संस्था, कर्मचारी, गावाचे सरपंच व ग्रामस्थांनी सकाळी सात वाजेपासून श्रमदानात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.
निम गावाने वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला असून,तरूणांनी स्थापन केलेल्या पाणी फाऊंडेशन व सरपंचानी १ मे रोजी महाश्रमदानात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन केले होते.जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.जळगाव यांनी देखील महाश्रमदानात जास्तीत जास्त अधिकारी,कर्मचार्रयानी सहभागी होण्याचे पत्र निर्गमित केल्याने ,१ मे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर तालुक्यातील अधिकारी ,कर्मचारी वगार्ने थेट निम येथे महाश्रमदान परीसर गाठला.
तहसिलदार ज्योती देवरे,गटविकास अधिकारी अजयकुमार नष्टे,कृषि अधिकारी भारत वारे,बालविकास प्रकल्प अधिकारी वारूळकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पाटोळे,गटशिक्षणाधिकारीआर.डी.महाजन,मारवड मंडळ अधिकारी शिंदे,अमळनेर वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.राजेंद्र चौधरी,पारोळा वनविभागाचे वनक्षेत्रपाल,वनरक्षक,वनपाल,कर्मचारी,पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक आप्पा पाटील,तांत्रिक प्रशिक्षक प्रशांत पवार,सोनल नेवे,गोरख बढे,अमोल कचरे,गौरव ठाकरे,मधुकर ऊंडाळकर,शारदा वाळके,मारवड प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेविका,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,गावाचे सरपंच,पदाधिकारी,चोपडा तालूक्याचे जलमित्र,बिडीओ संदिप वायाळ,प्रताप महाविद्यालयाचे विद्यार्थी,शिक्षण विस्तार अधिकारी डि.पी.धनगर,शहापूर केंद्र प्रमुख सोनवणे,प्राथमिक शिक्षक शिक्

Web Title: Officials at Nim, the villagers did the four-hour workshops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव