अपसंपदाप्रकरणी पाटबंधारे विभागाच्या भांडारपालाविरुध्द गुन्हा

By admin | Published: June 14, 2017 05:16 PM2017-06-14T17:16:14+5:302017-06-14T17:16:14+5:30

सेवाकाळात त्यांनी 20 लाख 27 हजार 166 रुपयांची अपसंपदा जमविल्याचे चौकशीत उघड झाले.

Offshore crime against the stockholder of the Irrigation Department | अपसंपदाप्रकरणी पाटबंधारे विभागाच्या भांडारपालाविरुध्द गुन्हा

अपसंपदाप्रकरणी पाटबंधारे विभागाच्या भांडारपालाविरुध्द गुन्हा

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 14 - उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा जास्त मालमत्ता आढळून आल्याने पाटबंधारे विभागातील निवृत्त भांडारपाल भगवान पुंजाजी बोदडे (रा.वाघनगर), त्यांची प}ी व मुलगा यांच्याविरुध्द बुधवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला. सेवाकाळात त्यांनी 20 लाख 27 हजार 166 रुपयांची अपसंपदा जमविल्याचे चौकशीत उघड झाले. बोदडे यांनी गैरमार्गाने पैसे कमावल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती.
बोदडे हे गिरणा पाटबंधोर विभाग येथे भांडारपाल या पदावर कार्यरत होते. 2015 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. लाचलुचपत विभागाचे उप अधीक्षक पराग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी सुरु होती. या चौकशीमध्ये 7 मार्च 1980 ते 31 डिसेंबर 2008 दरम्यान वेळोवेळी त्यांच्यासह कुटुंबियांच्या नावे त्यांनी 20 लाख 27 हजार 166 रुपयांची मालमत्ता गैरमार्गाने जमविल्याचे उघड झाले. प}ी अलका बोदडे व मुलगा दिलीप बोदडे यांनी अपसंपदा संपादीत करण्यासाठी बोदडे यांना सहाय्य केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे  भगवान बोदडे  यांच्या विरुध्द लाचलुचपत प्रतिबंध कायदा कलम 13 (1) (ई) सह 13 (2) प्रमाणे व त्यांची प}ी अलका व मुलगा दिलीप यांच्या विरुध्द भादंवि कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Offshore crime against the stockholder of the Irrigation Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.