संततधारेने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 01:13 PM2019-08-10T13:13:16+5:302019-08-10T13:14:38+5:30

बाजारपेठेत शुकशुकाट : चहूकडे पाणीच पाणी

The offspring completely disrupted life | संततधारेने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

संततधारेने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

Next

जळगाव : गेल्या दोन आठवड्यांपासून सलग सुरू असलेल्या व आता तर तीन दिवसांपासून थोडाही खंड न घेता सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील वेगवेगळ््या भागात पाण्याचा निचरा होत नसल्याने तसेच चिखल अधिकच वाढत असल्याने विद्यार्थ्यांना तसेच रहिवाशांचे हाल होत आहेत.
यंदा जून महिन्यात पाऊस लांबल्याने सर्वच जण चिंतेत होते. त्यानंतर मात्र जुलै महिन्यापासून सुरू झालेला पाऊस चांगलाच वाढत गेला. दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसाने शहरातील रस्त्यांची अत्यंत बिकट स्थिती झाली आहे. त्यात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी रात्रीपर्यंत सलग सुरूच असल्याने त्याचा जवजीवनावर मोठा परिणाम झाला आहे.
जोरदार पावसामुळे नवीपेठ, जिल्हा क्रीडा संकुलनजीक पाणी साचत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले की हे पाणी कमी होते, मात्र पुन्हा जोरदार पाऊस झाला की पुन्हा पाणी साचते. त्यामुळे तीन दिवसांपासून वाहन धारकांना आपली वाहने काढताना कसरत करावी लागत आहे. या सोबतच जिल्हा रुग्णालयासमोर, श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान, बालगंधर्व नाट्यगृह इत्याही भागातही असेच अनुभव येत आहे. - जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले जात आहे तर रिपरिप पावसामुळे कॉलनी भागात चिखलच चिखल होत आहे.
-शहरात अनेक ठिकाणी एकमेकांना जोडणाऱ्या दोन भागांचा रस्ता वाहून गेल्याने तर काही ठिकाणी पाईप वाहून गेल्याने रहिवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. नाल्याचे पाणी रस्त्यावर असल्याने विद्यार्थ्यांना ते धोकेदायक ठरत आहे. अनेक भागात घरांच्या आजूबाजूला पाणी साचले आहे. त्यामुळे रहिवाशी भयभीत झाले आहेत.

रोजगार झाला ठप्प भाजीपाला महागला
जळगाव : पावसाने गेल्या दोन दिवसात थोडा वेळही उसंत न घेतल्याने जळगावातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे़ संपूर्ण शहरात सर्वत्र पाणी साचल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत़ शहरातील झोपडपट्टी भागात परिस्थिती भयावह झाली आहे़ नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याने बाजारपेठा मंदावल्या आहेत़ हातमजूरी करणाऱ्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़ रस्त्यांची वाट लागल्याने वाहनधारकांचे हाल होत आहे़ अनेक भागात मोठे पाणी साचले आहे़ जनजीवन सुरळीत होण्यासाठी पावसाने काही काळ उघडीप द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़ सततच्या पावसामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या समस्या जाणवणार असल्याची भिती वर्तविण्यात येत आहे़ गुरूवारी रात्री मुसळधार कोसळल्यानंतर शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती़ जीवन जगण्याशी निगडीत अनेक बाबींवर या पावसामुळे विपरीत परिणाम जाणवायला लागला आहे़ भाजीपाला महागला आहे तर अनेक छोटे मोठ व्यवसाय ठप्प झाले आहेत़ अनेक भागांमध्ये गुडघ्याऐवढे पाणी साचल्याने रस्ते बंद झालेले आहेत़

२४ तास आपत्कालीन व्यवस्था तैनात ठेवण्याच्या सूचना
जळगाव : आठवड्याभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील सर्वच नाले भरून वाहत आहेत. पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, आपत्कलीन परिस्थिती उद्भवल्यास २४ तास मनपा कर्मचाºयांनी तैनात राहण्याचा सूचना उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी आपात्कलीन विभागाला दिल्या़
शुक्रवारी उपमहापौरांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी अग्निशमन विभागाचे प्रमुख शशिकांत बारी, नगरसेवक धीरज सोनवणे यांच्यासह आपत्कलीन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. अनेक भागातील गटारी ओव्हरफ्लो झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून, मोठे नाले व उपनाले देखील भरले आहेत. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यास नाल्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असते, अशा भागांमध्ये जावून पाहणी करण्याचा सूचना उपमहापौरांनी दिल्या.

 

Web Title: The offspring completely disrupted life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.