अरे बापरे... जळगावात बाधित, संशयित ४२ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 22:33 IST2021-04-19T22:32:53+5:302021-04-19T22:33:48+5:30
जिल्ह्यात सोमवारी १,१४७ नवे रुग्ण आढळून आले असून १,२०९ रुग्ण बरे झाले आहेत.

अरे बापरे... जळगावात बाधित, संशयित ४२ जणांचा मृत्यू
जळगाव : जिल्हाभरात कोरोनाबरोबरच संशयित, पोस्ट कोविड, तसेच सारीच्या रुग्णांची प्रथमच शासन स्तरावर नोंद करण्यात आली असून सोमवारी अशा १८ रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आला आहे. यासह २४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकाच दिवसात ४२ मृत्यू नोंदविण्यात आले आहे.
जिल्ह्यात सोमवारी १,१४७ नवे रुग्ण आढळून आले असून १,२०९ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या १० दिवसातील रुग्ण बरे होण्याची ही सर्वाधिक संख्या आहे. सोमवारी बाधितांमध्ये चोपडा तालुक्यात सर्वाधिक ५ मृत्यू झाले असून पाचोरा ४ आणि जळगाव शहरात ३ बाधितांचे मृत्यू झाले आहेत.