अरे देवा...जिल्ह्यात या रोगाचे ५ हजारांवर संशियत रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 12:44 PM2020-12-21T12:44:39+5:302020-12-21T12:56:24+5:30
जळगाव : जिल्हाभरात क्षयरोग आणि कृष्ठ रोग मोहीम राबविण्यात आली असून यात क्षयरोगाचे (टीबी) १७५ बाधित तर ५७७७ संशियत ...
जळगाव : जिल्हाभरात क्षयरोग आणि कृष्ठ रोग मोहीम राबविण्यात आली असून यात क्षयरोगाचे (टीबी) १७५ बाधित तर ५७७७ संशियत रुग्ण आढळून आले आहेत. अजूनही अनेकांचे एक्सरे आणि नमुने तपासणी बाकी असल्याने ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
यासह कृष्ठरोगाचेही १६६ नवे रुग्ण या मोहीमेत समोर आले असून या रुग्णांना औषधोपचार सुरू करण्यात येणार आहे. संशयितांची पूर्ण तपासणी बाकी असून त्यातूनही अनेक रुग्णसमोर येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात १ ते १६ डिसेंबर दरम्यान घरोघरी जावून हे सर्वेक्षण करण्यात आले होते. यात ३१ लाख २५ हजार६१९ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. सहाय्यक संचालक डॉ. ईरफान तडवी आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे यांनी या मोहीमेत प्रमुख भूमिका बजावली आहे.