तेल,वायूसाठे शोध मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2017 12:31 AM2017-03-30T00:31:43+5:302017-03-30T00:31:43+5:30

मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळ्यात संशोधन : 300 कर्मचा:यांचा ताफा

Oil, Gas Station Search Campaign | तेल,वायूसाठे शोध मोहीम

तेल,वायूसाठे शोध मोहीम

googlenewsNext

मुक्ताईनगर : केंद्र शासनाच्या ग्रिन प्रोजेक्ट अंतर्गत ओएनजीसीतर्फे   भूगर्भातील तेल आणि वायू साठे शोधण्याच्या उपक्रमाअंतर्गत तालुक्यात सारोळा शिवारात शोधपथकातर्फे वायू साठा शोधण्याचे काम सुरू आहे. तब्बल 300 कर्मचारी या निमित्त  तालुक्यात दाखल झाले आहे. साक्री (धुळे) ते थेट नागपूर दरम्यान येणा:या पट्टय़ात हे संशोधन वजा तेल व वायू शोधला जात आहे.
राज्यभरात भूगर्भातील तेल, वायू आणि खनिज साठे शोध घेण्याबाबत केंद्राच्या ग्रिन प्रोजेक्टअंतर्गत ऑईल अॅण्ड नॅचरल गॅस कार्पोरेशनतर्फे काम हाती घेण्यात आले आहे. यात राज्यभरातील सुमारे 500 कि.मी.चा एक पट्टा या प्रमाणे तब्बल 220 पट्टय़ात ही शोधमोहीम राबवली जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधकांनी यापूर्वी  प्राथमिक संशोधन करून अशा प्रकारचे पट्टे सूचविले आहेत.
नियोजित पट्टय़ात राज्यात पहिला टप्पा साक्री जि.धुळे ते थेट नागपूर दरम्यान पहिले काम सुरू झाले आहे. 2016 अखेर या शोध पथकाने तालुक्यात प्रवेश केला. निर्धारीत पट्टय़ात प्रत्येक 60 मीटर अंतरावर तब्बल 120 मीटर खोलर्पयत भूगर्भात छिद्र पाडले जात आहे व या प्रत्येक छिद्रला परस्परांसोबत इलेक्ट्रॉनिक केबल व उपकरणाच्या सहाय्याने समांतर जोडणी केली जात आहे. तब्बल 300 मजूर आणि अद्ययावत तंत्रज्ञानाशी जोडणी केलेल्या वाहनाद्वारे हि समांतर जोडणी तपासणी केली जात आहे आणि प्रत्येक जोडणी मुंबई येथील मुख्य संशोधक कार्यालयाशी कनेक्ट केली जात आहे. जमिनीत चार इंच छिद्र 120 मीटर खोली र्पयत करण्यासाठी सुरू असलेल्या कामाची हाताळणी लक्ष्मी इंजिनिअरींग अॅण्ड ड्रिलींगतर्फे केली जात आहे. तर इलेक्ट्रॉनिक जोडणी अल्फा डीओ इंडिया व अन्य एका कंपनीमार्फत हाताळली जात आहे. या कामांवर नियंत्रक म्हणून इंडोनेशियाचे अकमद रेमन्ड काम पाहत आहे तर निरीक्षक म्हणून आंध्रप्रदेशचे टी.प्रकाश काम पाहत आहे. पुढील तीन ते चार महिने हे शोधपथक तालुक्यात राहणार आहे. पुढे त्यांचा विदर्भात प्रवेश होणार आहे. बोहर्डी, हरताळा वनक्षेत्र, सारोळा या भागात त्यांनी जमिनीत केलेल्या 120 मीटर छिद्र वजा कूपनलिकेत उपकरण सोडून त्यांची संलगAता मुंबई येथील मुख्य कक्षाशी आतार्पयत जोडण्यात आली आहे. तब्बल 300 मजूर व कर्मचा:यांचा ताफा या कामावर कार्यत आहे. (वार्ताहर)
केंद्र शासनाच्या ग्रिन प्रोजेक्ट म्हणून हा उपक्रम आहे. ओएनजीसीतर्फे ही शोध मोहिम राबविली जात आहे. भूगर्भातील नैसर्गिक खनिज शोधण्याबाबतचा हा प्राथमिक सव्र्हे आहे.
- के.एम.राव,
दलप्रमुख,चैन्नई

Web Title: Oil, Gas Station Search Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.