ओजस्विनीच्या ‘रिमझीम’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2017 06:02 PM2017-07-07T18:02:24+5:302017-07-07T18:02:24+5:30
केसीई सोसायटीच्या ओजस्विनी कला विभागाच्या चार दिवसीय ‘रिमझीम-रिमझीम’ या चित्र, शिल्पकला प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी शहरातील लेवा बोर्डीग सभागृहात करण्यात आले.
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.7 -केसीई सोसायटीच्या ओजस्विनी कला विभागाच्या चार दिवसीय ‘रिमझीम-रिमझीम’ या चित्र, शिल्पकला प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी शहरातील लेवा बोर्डीग सभागृहात करण्यात आले. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी औरंगाबाद येथील रांगोळी कलाकार महेंद्र खाजेकर यांनी प्रात्याक्षिकाव्दारे अवघ्या तासाभरात पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांचे चित्र रेखाटून उपस्थितांना थक्क केले.
प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, केसीई सोसायटीचे सदस्य किरण बेंडाळे, मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रदर्शनात 700 हून अधिक चित्रांचा समावेश
या प्रदर्शनात विद्याथ्र्यानी तयार केलेल्या 700 हून अधिक चित्रकृती लावण्यात आल्या आहेत. यामध्ये संकल्प चित्र, स्मरण चित्र, डिजाइन, स्केचिंग, निसर्ग चित्र, पेन्सिल रोडींग, ऑईल पेटिंग, लोगो डिझाईन, कॅलीग्राफी पोट्रेट, क्रिएटिव्ह पेटिंग, अॅब्स्ट्रॅक पेटिंग, पोस्टर क्राप्ट, 3 डी डिजाइन, जाहिरात कला, फोटोग्राफी, 2 डी डिजाइन आदींचा समावेश आहे.
11 जुलै र्पयत सुरू राहणार प्रदर्शन
प्रदर्शनात खास पावसाळ्यावर आधारित काही चित्र आणि छायाचित्र लावण्यात आले आहेत. तर शिल्पकलेचे काही डिझाईनदेखील प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. 11 जुलै र्पयत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. रविवारी सकाळी 11.30 वाजता पुणे येथील सुप्रसिध्द चित्रकार गणेश तळसकर यांचे कॅन्व्हॉस वर तैलारंगात व्यक्तीचित्रणाचे या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.