ओखा-पुरी एक्स्प्रेस बुधवार पासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:16 AM2021-05-20T04:16:45+5:302021-05-20T04:16:45+5:30
सुरतकडून येणाऱ्या गाड्यांना लॅटफार्म पाचवर नियमीत वळविल्या जळगाव : जळगाव रेल्वे स्टेशनवर गेल्या वर्षी उभारण्यात आलेल्या प्लॅटफार्म क्रमांक पाच ...
सुरतकडून येणाऱ्या गाड्यांना लॅटफार्म पाचवर नियमीत वळविल्या
जळगाव : जळगाव रेल्वे स्टेशनवर गेल्या वर्षी उभारण्यात आलेल्या प्लॅटफार्म क्रमांक पाच वर सर्व प्रकारचे तांत्रिक काम पूर्ण करण्यात आल्यामुळे, सुरत कडून येणाऱ्या सर्व एक्स्प्रेस गाड्या या फ्लॅटफार्मवर नियमित थांबविण्यात येत आहेत. पूर्वी या गाड्या लॅटफार्म क्रमांक तीन वर थांबविल्या जात होत्या. दरम्यान, या पुढे सुरतकडून येणाऱ्या सर्व गाड्या रेल्वे प्रशासनातर्फे लॅटफार्म पाचवर नियमित करण्यात आल्या आहेत.
रेल्वे बोर्डाच्या आदेशानंतरच जनरल तिकीट सुरू होणार
जळगाव :रेल्वे प्रशासनाने मेमू ट्रेनच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला असला तरी, या गाडीलाही कोरोनामुळे जनरल तिकीट बंदच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट आरक्षण करूनच प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनातर्फे इतर गाड्यांनाही जनरल तिकीट बंद असल्याने, याबाबत रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे बोर्डाच्या आदेशानंतच सर्व जनरल तिकिटांची विक्री सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी
जळगाव : शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दर दिवसाआड दुचाकी चोरीला जात आहेत. तरी पोलीस प्रशासनाने गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.