भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्याची जुनी इमारत आज होणार जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:33 PM2018-12-24T22:33:25+5:302018-12-24T22:34:49+5:30
रेल्वे प्रशासनाने भविष्याचा विचार करून रेल्वे परिसराचा चेहरा मोहरा बदलला आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील असलेली लोहमार्ग पोलीस ठाण्याची इमारत मंगळवारी जमीनदोस्त करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी दिवसभर या पोलीस ठाण्यातील फाईल व इतर सामान नवीन इमारतीमध्ये स्थलांतर करण्याचे काम सुरू होते.
भुसावळ, जि.जळगाव : रेल्वे प्रशासनाने भविष्याचा विचार करून रेल्वे परिसराचा चेहरा मोहरा बदलला आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील असलेली लोहमार्ग पोलीस ठाण्याची इमारत मंगळवारी जमीनदोस्त करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी दिवसभर या पोलीस ठाण्यातील फाईल व इतर सामान नवीन इमारतीमध्ये स्थलांतर करण्याचे काम सुरू होते.
डीआरएम आर.के.यादव यांनी रेल्वे हद्दीतील अतिक्रमण मोहीम यशस्वीपणे राबविल्यानंतर रेल्वेच्या उत्तर व दक्षिण दोन्ही प्रवेशद्वारांचे सौंदर्यीकरण, अद्ययावतीकरण करण्याचे काम सुरू आहे. याचाच भाग म्हणून दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेली लोहमार्ग पोलीस ठाण्याची जुनी इमारती पाडण्यात आली. सुरुवातीला त्याच्या चार खोल्या पाडल्यानंतर या ठिकाणी खडकी (पुणे) येथून आणण्यात आलेले टी-५५ बॅटल टँक अर्थात रणगाडा ठेवण्यात आला आहे. उरलेल्या इमारतीच्या खोल्या पाडून येथे अद्ययावत उद्यान उभारण्यात येणार आहे.
दरम्यान, लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीमध्ये एकूण १५ खोल्या होत्या. यातील क्राईम कार्यालय, गुप्त माहिती विभाग, एलसीबी व डीबी या खोल्या आधीच पाडण्यात आल्या. उरलेल्या खोल्यातील महिला व पुरुष लॉक अप, प्रभारी अधिकारी कार्यालय, सहायक प्रभारी अधिकारी कार्यालय, वायरलेस रूम, मुद्देमाल रूमच्या तीन खोल्या, ठाणे अंमलदार कार्यालय, ड्युटी अंमलदार कार्यालय, संगणक कक्ष, कारकून खोली या सगळ्या मंगळवारी जमीनदोस्त करण्यात येणार आहे.
दरम्यान, असलेल्या खोल्यांमधील सामान, फाईल, कपाट, संगणक महत्त्वाचे दस्तावेज जुन्या पार्सल आॅफिसवर बांधण्यात आलेली नवीन इमारतीमध्ये सामान हलविण्याचे काम सोमवारी दिवसभर सुरू होते.
बँटल टँक टी-५५ ला पाच रंग
खडकी (पुणे) येथून तीन दिवसांच्या प्रवासानंतर आणण्यात आलेला बॅटल टी-५५ या क्रीम, मिल्ट्री ग्रीन, सिम्पल ग्रीन, रेड सिग्नल व काळा असे एकूण पाच रंग मारण्याचे काम सुरू आहे. त्याचेही सोमवारी अधिकारी वर्गाने निरीक्षण केले. रंगरंगोटीनंतर या रणगाड्याची सेल्फी पॉईट म्हणून ओळख निर्माण होणार आहे.