जुने जळगावात बालिकेला कुत्र्याचा चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:16 AM2021-08-01T04:16:53+5:302021-08-01T04:16:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पंधरा दिवसांपूर्वी जुने जळगावात एका पांढऱ्या कुत्र्याने दहशत माजविली होती. पुन्हा या परिसरात एका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पंधरा दिवसांपूर्वी जुने जळगावात एका पांढऱ्या कुत्र्याने दहशत माजविली होती. पुन्हा या परिसरात एका कुत्र्याने एका ५ वर्षीय बालिकेला पायाला गंभीर चावा घेतला आहे. या बालिकेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न बिकट आहे.
दिशा शिवदास बाविस्कर (५) रा. जुने जळगाव, आंबेडकर नगर ही अंगणात खेळत असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची कुत्री धावत आली व अचानक तिने दिशाच्या पायाला चावा घेतला. तिने आरडाओरड केल्यानंतर शेजारी बसलेल्या महिलांनी तातडीने धाव घेत तिला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. या कुत्र्याने परिसरात दोन महिलांना अजून चावा घेतल्याची माहिती मिळाली.
.. आम्ही बाहेर निघायचे नाही का ?
परिसरात या आधीही मोकाट कुत्र्याने अनेकांना चावा घेतला, यात अनेक जण गंभीर जखमी झाले. अनेकांच्या जीवापर्यंत ही गोष्ट गेली, असे असतानाही महापालिकेकडून काहीच होत नसून, आम्ही आता बाहेरही निघायचे नाही का? असा संतप्त सवाल दिशाची आई व काकू यांनी केला आहे. त्या दिशाजवळ कक्षात थांबून होत्या. या ठिकाणी बालिकेला एक इंजेक्शन देऊन डॉक्टरांनी निगराणीखाली ठेवले होते.