सोने पॉलिशच्या बहाण्याने वृध्द महिलेला गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 09:40 PM2018-10-26T21:40:26+5:302018-10-26T21:42:18+5:30
विवेकानंद कॉलनीमध्ये सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याचे सांगत वृध्द महिलेचे दोन लाख ४० हजार रुपये किमतीचे एकूण १२ बारा तोळे सोने दोघे अज्ञात इसमांनी गंडवल्याची घटना २६ रोजी सकाळी १०:३० वाजता घडली.
चाळीसगाव - येथील विवेकानंद कॉलनीमध्ये सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याचे सांगत वृध्द महिलेचे दोन लाख ४० हजार रुपये किमतीचे एकूण १२ बारा तोळे सोने दोघे अज्ञात इसमांनी गंडवल्याची घटना २६ रोजी सकाळी १०:३० वाजता घडली.
शहरातील विवेकानंद कॉलनीतील रहिवाशी सुमनबाई जगन्नाथ भोकरे यांना अज्ञात दोन व्यक्तींनी पितळाच्या भांड्यांना पॉलिश करून देतो असे सांगितले. त्यानंतर घरातील चांदीच्या पादुकांनादेखील पॉलिश करून दिली. त्यानंतर त्या दोघांनी सुमनबाई यांच्या अंगावरील सोन्याचे दागिणे बघून तुमच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करुन देऊ असे सांगितले. पितळी भांडे व चांदीच्या वस्तूंना पॉलीश केल्यानंतर सुमनबाई यांनी हातातील ६० ग्रॅम वजनाच्या ४ सोन्याच्या बांगड्या व ६० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या त्यांच्याकडे काढून दिल्या. भामट्यांनी सुमनबाई यांना दागिन्यांना चकाकी येण्यासाठी गरम पाणी लागेल असे सांगून घरातून गरम पाणी मागितले. त्या घरात गेल्यानंतर दोघे ही चोरटे तेथून पसार झाले. सुमनबाई घरा बाहेर पाणी घेवून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी आरडाओरड केली असता आजू-बाजूचे नागरिक जमा झाले.
त्यांनी त्या चोरट्यांचा शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाही. सुमनबाई भोकरे यांनी तत्काळ पोलीस स्टेशनला धाव घेत आपबिती कथन केली. त्यानंतर सुमनबाई भोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात दोघांविरूद्ध भा.दं.वि.४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हे.कॉ.बापुराव भोसले करीत आहे.