जळगावात बसच्या पुढच्या चाकाखाली आल्याने वृद्धेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:45 AM2021-02-20T04:45:35+5:302021-02-20T04:45:35+5:30
जळगाव : एसटी बसच्या पुढील चाकाखाली आल्याने देवकाबाई नारायण सपकाळे (७०, रा.कानळदा, ता.जळगाव) या वृद्धेचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना ...
जळगाव : एसटी बसच्या पुढील चाकाखाली आल्याने देवकाबाई नारायण सपकाळे (७०, रा.कानळदा, ता.जळगाव) या वृद्धेचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता नवीन बसस्थानकात घडली. पाय घसरल्याने वृद्धा खाली पडली व त्याचवेळी बसचे चाक तिच्या डोक्यावरून गेले.
देवकाबाई नारायण सपकाळे, लीलाबाई व्यंकट सोनवणे (रा.लाडली, ता.धरणगाव) व सिंधूबाई मुरलीधर कोळी (रा.चिंचोली, ता.यावल) या तिघं बहिणी चाळीसगाव येथे लीलाबाई सोनवणे यांच्या नातीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होत्या. गुरुवारी हा कार्यक्रम झाल्यानंतर शुक्रवारी सकाळीच आपापल्या गावाला जाण्यासाठी बसने जळगावात आल्या असता तेव्हा हा अपघात झाला. मनमाड आगाराचा चालक राजू गंगाधर अहिरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देवकाबाई यांचे सासर भोकर, ता.जळगाव तर माहेर कानळदा आहे. त्यांना मूलबाळ नाही. त्या एकट्याच रहात होत्या.