नळावर पडल्याने वृध्दाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:29 AM2021-03-13T04:29:14+5:302021-03-13T04:29:14+5:30
बळीराम पेठेतील प्रौढाचा मृत्यू जळगाव : बळीराम पेठेतील गोपाल दत्तात्रय पवार (५१) यांची प्रकृती अत्यावस्थ झाल्यानंतर त्यांना गुरूवारी जिल्हा ...
बळीराम पेठेतील प्रौढाचा मृत्यू
जळगाव : बळीराम पेठेतील गोपाल दत्तात्रय पवार (५१) यांची प्रकृती अत्यावस्थ झाल्यानंतर त्यांना गुरूवारी जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान, तपासणीअंती वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रईस शेख करीत आहेत.
कामात स्मार्टवर्कचा उपयोग करावा
जळगाव : मू.जे.महाविद्यालयातर्फे शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी ऑनलाईन वेबिनार घेण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. बी. बी. पाटील वेबिनारचे प्रमुख वक्ते होते. शिक्षकेतर कर्मचा-यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्याशी आपली वागणूक आणि कार्यप्रणाली कशी असायला पाहिजे हे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले. तसेच आपापल्या विभागात काम करीत असतांना आपले काम कसे सोपे होईल, कशा प्रकारे स्मार्टवर्कचा उपयोग आपल्या कामात केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. या वेबिनारला ५० पेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
जळगाव : केसीई सोसायटीचे शिक्षण शास्त्र आणि शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथे क्रांतीज्योती व स्त्री शिक्षण प्रणेत्या सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त प्रतिमापूजन डॉ.कुंदा बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य अशोक राणे, सहाय्यक प्रा. संदीप केदार, ग्रंथपाल मनीष वनकर,संजय जुमनाके व मोहन चौधरी आदी उपस्थित होते.
एसएनडीटी महाविद्यालयात महिला दिना साजरा
जळगाव : एसएनडीटी महिला महाविद्यालयात नुकताच महिला दिन साजरा करण्यात आला. वर्तमान स्त्री: काही निरिक्षणे या विषयावर निवेदिता चक्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जयश्री नेमाडे, उपप्राचार्य सतिष जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिंपल पाटील यांनी केले तर आभार प्रा. संजय भामरे यांनी मानले़ यशस्वीतेसाठी साधना जावळे, सोमनाथ लोकरे, प्रकाश कांबळे आदींनी परिश्रम घेतले.