ट्रॉलीची पासिंग न करता परस्पर जुना क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 07:41 PM2018-07-20T19:41:19+5:302018-07-20T19:43:23+5:30
आरटीओ एजंटासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर, जि.जळगाव : नवीन विकत घेतलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीची पासिंग न करता परस्पर संगनमत करून जुना क्रमांक टाकल्याप्रकरणी आरटीओ एजंटासह दोन जणांविरुद्ध अमळनेर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनकर रामा पाटील रा.खेडी व्यवहारदळे, ता.अमळनेर यांनी २०१३ मध्ये ट्रॅक्टरची नवीन ट्रॉली विकत घेतली होती. परंतु त्या ट्रॉलीची पासिंग न करता परस्पर, एजंट एन.के.पाटील यांच्याशी संगनमत करून त्यांनी पारोळा तालुक्यातील एमएच-१९-पी-१२९२ हा एका वाहनाचा क्रमांक टाकून त्या ट्रॉलीचा वापर करीत होते. परंतु ही बाब आरटीओ अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. तेव्हा एन.के.पाटील हे आरटीओच्या अधिकाºयांवर दबाब टाकत होते. परंतु त्यांचा दबाब झुगारून आरटीओचे लिपिक इफतेखार नजीमोद्दीन शहा यांनी फिर्याद दिली. त्यावरून ट्रॉलीमालक दिनकर पाटील व एन.के.पाटील यांच्याविरुद्ध अमळनेर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुभाष साळुंखे करीत आहेत.