पुरातन वास्तू समाजासाठी प्रेरणादायक असतात - सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 05:26 PM2017-08-09T17:26:40+5:302017-08-09T19:00:21+5:30
शिरसोली येथील बारी भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उत्साहात
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.9 : पुरातन वास्तू या इतिहासातील अनेक निर्णयाच्या साक्षीदार असतात. त्यामुळे अशा पुरातन वास्तू या समाजाला दिशा देण्याचे काम करीत असल्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी बारी भवनाच्या भूमिपूजनाप्रसंगी केले.
शिरसोली प्र.न. येथील सूर्यवंशी बारी पंच मंडळातर्फे सोमवारी सकाळी 11 वाजता बारी भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते दीपप्रज्वालन झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश अस्वार तर उद्घाटन जि.प.सदस्या धनुबाई आंबटकर यांच्या हस्ते झाले. भूमिपूजन सुर्यवंशी बारी पंच मंडळाचे अध्यक्ष रंगराव बारी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका शोभा बारी, डॉ.अरुण बारी, डॉ.अमिता बारी, विकासो चेअरमन रामकृष्ण काळे, शिरसोली प्र.बो.बारी पंच मंडळाचे अध्यक्ष बंडू अस्वार, महाराष्ट्र राज्य बारी सेवा संघाचे रामदास नारायण अस्वार, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ बाबूराव अस्वार, ग्रा.पं.सदस्य सुरेश पंढरीनाथ बारी, ग्रा.पं.सदस्य गोपाल अस्वार, रामकृष्ण काटोले, माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सदाशिव एका ताडे, नायब तहसीलदार दिलीप बारी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नरेंद्र सोनवणे,पं.स.सदस्य नंदलाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी समाजाच्या वास्तूसाठी 51 हजार तर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी 1 लाखांची देणगी जाहीर केली. तसेच बारी पंच मंडळाचे अध्यक्ष रंगराव बारी यांनी 51 हजार, जि.प.चे माजी सदस्य सुरेश अस्वार यांनी 11 हजारांची तसेच किसन ताडे यांच्यासह पंच मंडळाच्या प्रत्येक संचालकांनी देखील बारी भवनाच्या बांधकामासाठी देणगीची घोषणा केली. सूत्रसंचालन मनोज अस्वार व संतोष आंबटकर यांनी तर आभार भगवान बुंधे यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष रमेश काटोले, शरद नागपुरे, भागवत ताडे, राजेंद्र आंबटकर, सुनील ताडे, निवृत्ती सुóो, मनोज अस्वार, योगेश बुंदे, माधव राऊत, कैलास काटोले, गिरीश वराडे, कैलास आगे यांनी परिश्रम घेतले.