टंचाईच्या जीवघेण्या झळा, शेंगोळा येथे पाणी भरण्यासाठी गेलेल्या वृद्धेचा विहिरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 11:30 AM2018-05-03T11:30:54+5:302018-05-03T11:30:54+5:30

जामनेर तालुक्यातील घटना

Old women drowning in water | टंचाईच्या जीवघेण्या झळा, शेंगोळा येथे पाणी भरण्यासाठी गेलेल्या वृद्धेचा विहिरीत पडून मृत्यू

टंचाईच्या जीवघेण्या झळा, शेंगोळा येथे पाणी भरण्यासाठी गेलेल्या वृद्धेचा विहिरीत पडून मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देपाणी टंचाईने घेतला वृध्देचा बळीपाणी टंचाईकडे लक्ष देण्याची गरज

आॅनलाइन लोकमत
जामनेर, जि. जळगाव, दि. ३ - जामनेर तालुक्यातील पाणी टंचाईची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून गुरुवारी सकाळी ८ वाजता शेंगोळा येथे खाजगी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या नर्मदाबाई आनंदा आढाव (७२) या वृध्देचा तोल जावून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
शेंगोळा गावाची लोकसंख्या ३ हजार असून, गावाला ८ कि.मी. अंतरावरील मोयगाव धरणातून पाणीपुरवठा होतो. यंदा कमी पावसामुळे धरणात अत्यंत कमी पाणी साठा असल्याने गावकऱ्यांना नळाद्वारे १५ दिवसानंतर पाणी मिळते. पाणी पुरवठ्याची विहीर आटल्याने महिला गावाजवळील विहिरीवरुन पाणी आणतात. गुरुवारी सकाळी नर्मदाबाई या इतर महिलांसोबत विहिरीतून पाणी काढत असताना त्या अचानक तोल जाऊन विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाने गावातील पाणी टंचाईकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. घटनेनंतर विहिरीजवळ मोठी गर्दी झाली होती. ग्रामस्थांनी विहिरीत उतरून वृद्धेचा मृतदेह बाहेर काढला.

Web Title: Old women drowning in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.