भुसावळ येथे ऑलिम्पिक जागरण अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 05:51 PM2021-07-25T17:51:14+5:302021-07-25T17:52:31+5:30

ऑलिंपिक स्पर्धेतील खेळाडूंचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी ऑलिंपिक जागरण उपक्रमाचा शुभारंभ झाला.

Olympic Awakening Campaign started at Bhusawal | भुसावळ येथे ऑलिम्पिक जागरण अभियान

भुसावळ येथे ऑलिम्पिक जागरण अभियान

Next

भुसावळ : टोकियो येथे सुरू झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेतील खेळाडूंचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी ऑलम्पिक जागरण उपक्रमाचा शुभारंभ झाला. तालुका क्रीडा संकुल समिती, राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षक शिक्षक महासंघ, क्रीडा स्पर्धा समिती यांच्यातफर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतातील खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यात महाराष्ट्राचे १० खेळाडूंचा समावेश आहे. सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी व तालुक्यात खेळाचे वातावरण निर्माण व्हावे खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे तसेच ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी गांधी पुतळ्याजवळ कॊरोनेशन क्लब भुसावळ च्या प्रांगणात सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करण्यात आले.
तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय सावकारे यांनी उद्‌घाटन केले. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष तहसीलदार दीपक धिवरे, संकुल समितीचे सचिव तालुका क्रीडा अधिकारी मार्क धर्माई, तालुका क्रीडा समन्वयक बी. एन. पाटील, राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महाराष्ट्र संघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, इबटा संघटनेचे जिल्हाध्यक्ष, आर. आर. धनगर. भुसावळ हायस्कूल चे पर्यवेक्षक प्रमोद शुक्ला, राजेंद्र कुलकर्णी, एम. के. वाणी उपस्थित होते.
कार्यक्रमास हिंदू सभा न्यास, कोरोनेशन क्लब व सतेज क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, व खेळाडू, द . शि. विदयालय भुसावळ चे शिक्षक आर. डी. पाटील, संदीप जाधव, एम. पी. नेहते, शरीफ तडवी, सचिन राजपूत, दर्शन चिंचोले, सागर जल्लाद, खरे, श्याम माहूरक, नरेंद्र म्हस्के यांनी सहकार्य केले.

Web Title: Olympic Awakening Campaign started at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.