शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी जळगाव एसटी विभाग मालामाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2023 08:07 PM2023-12-06T20:07:29+5:302023-12-06T20:07:40+5:30

भाविकांची गर्दी लक्षात घेता १०० जादा बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते.

On the very first day of the Shiva Mahapuran story, Jalgaon ST Department goods | शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी जळगाव एसटी विभाग मालामाल 

शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी जळगाव एसटी विभाग मालामाल 

 भूषण श्रीखंडे 

जळगाव : कानळदा रोडवरील येथील बडे जटाधारी मंदिर येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांचे श्री शिवपुराण कथेला मंगळवारी सुरवात झाली. भाविकांची गर्दी लक्षात घेता १०० जादा बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र भाविकांची प्रचंड गर्दी पाहता तब्बल ५३४ बस फेऱ्या कथा स्थळी होऊन एसटीला पहिल्याच दिवशी ५ लाख ७७ हजार ५४ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

कानळदा रोड येथील वडनगरी फाटा येथे श्री शिवपुराण कथा ५ ते ११ डिसेंबर दरम्यान कथेचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांची मोठ्या संख्येने होणारी गर्दी लक्षात घेता जळगाव एस. टी. विभागाकडून कथा स्थळी दोन तात्पुरते बसस्थानक तयार करून १०० बस फेऱ्यांचे नियोजन केले होते. परंतू कथेच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी प्रचंड गर्दीमुळे जळगाव एसटी विभागाला तब्बल ५३४ बस फेऱ्या धावल्या. मात्र भाविकांच्या वाढलेल्या गर्दीमुळे जळगाव एस. टी. विभागाची मात्र तारांबळ उडाली होती.

जळगावमधून सर्वात जास्त बस फेऱ्या
शिवपुराण कथा स्थळी जळगाव एस.टी. विभागातून सर्वात जास्त २७४ जळगाव आगारातून एसटी बस फेऱ्या धावल्या. तर १ लाख १५ हजार ४५० रुपये एवढे उत्पन्न मिळाले.

चोपड्यावरून ही भाविकांची मोठी गर्दी
शिवपुराण कथा ऐकण्यासाठी जळगाव नंतर सर्वात जास्त चोपडा येथून भाविकांची मोठी गर्दी होती. चोपडा आगारातून १०० बस फेऱ्या या मंगळवारी भाविकांना घेऊन कथा स्थळी सोडण्यात आल्या. तब्बल २ लाख ६२९ रुपये उत्पन्न हे पहिल्या दिवशी मिळाले आहे.

१७ हजार किलोमीटर बस धावल्या
जळगाव एसटी विभागातील १० आगारातून शिवपुराण कथा स्थळी ५३४ बस मंगळवारी भाविकांना घेऊन आल्या होत्या. १७ हजार ५८९ किलोमीटर बस धावल्या असून ५ लाख ७७ हजार ५४ रुपयांचे यातून उत्पन्न जळगाव एसटी विभागाला मिळाले आहे.
 

Web Title: On the very first day of the Shiva Mahapuran story, Jalgaon ST Department goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव