एक एकरात लावलेल्या भरिताच्या वांग्याला तीन लाखाचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 05:06 PM2019-01-21T17:06:03+5:302019-01-21T17:07:56+5:30
बामणोद, ता.यावल येथील भरिताच्या वांग्याचे बियाणे आणून त्यातून विक्रमी उत्पादन टाकळी बुद्रूक, ता.जामनेर येथील शेतकरी विष्णू सदू माळी यांनी घेतले.
जामनेर, जि.जळगाव : बामणोद, ता.यावल येथील भरिताच्या वांग्याचे बियाणे आणून त्यातून विक्रमी उत्पादन टाकळी बुद्रूक, ता.जामनेर येथील शेतकरी विष्णू सदू माळी यांनी घेतले.
माळी यांनी आपल्या चार एकर शेतापैकी एक एकरात शेतात बामणोद वांगे या रोपाची लागवड केली. यासाठी त्यांना ४० हजार खर्च आला. त्यांना त्यापासून तीन लाख रुपये उत्पन्न निघाल्याचे ते सांगतात.
दोन्ही मुले शेतात मदत करीत असल्याने मजुरीचा खर्च वाचला. वांग्यांच्या विक्रीसाठी जामनेरची बाजारपेठ जवळ असल्याने वाहतुकीचाही खर्च कमी येतो. नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला. इतर पिकांच्या तुलनेत खर्च कमी व उत्पन्न अधिक असल्याने पुढील वर्षी जास्त लागवड करणार असल्याचे माळी यांनी सांगितले.