लग्नाचा बनाव करून दीड लाख लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:12 AM2021-06-30T04:12:08+5:302021-06-30T04:12:08+5:30

खिरोदा/सावदा, ता. रावेर : लग्नाचा बनाव करून खिरोद्याच्या तरुणाचे दीड लाख लुबाडणाऱ्या आरोपींविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा ...

One and a half lakh was stolen by pretending to be married | लग्नाचा बनाव करून दीड लाख लुबाडले

लग्नाचा बनाव करून दीड लाख लुबाडले

Next

खिरोदा/सावदा, ता. रावेर :

लग्नाचा बनाव करून खिरोद्याच्या तरुणाचे दीड लाख लुबाडणाऱ्या आरोपींविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुबाडणाऱ्या सात आरोपीपैकी एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

रावेर तालुक्यातील खिरोदा प्र. यावल येथील मिलिंद सुरेश इंगळे (वय ३४) यांनी ही फिर्याद दिली आहे. या सर्व आरोपींनी २० जून रोजी फिर्यादीच्या लग्नाचा बनाव करून त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना दीड लाख रुपयात लुबाडले. अमरावती शहराजवळच्या बडनेरा बायपास मार्गाजवळ हा लग्नाचा बनाव करण्यात आला होता.

२८ जून रोजी या गुन्ह्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार सावदा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. या सात आरोपीपैकी टाटा नगर गोवंडीची रहिवासी नाजनिनजा मोहम्मदखान या आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.

लालचंद ओमकार म्हसकर रा.पिंप्राळा जामठी, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद विशाल पाटील, अंकुश खडसे, नवरीची चुलत बहीण (नाव माहीत नाही), हर्षल पाटील, लताबाई अशी इतर सहा आरोपींची नावे आहे.

पुढील तपास पो. आर. डी.पवार करीत आहेत.

Web Title: One and a half lakh was stolen by pretending to be married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.