दोन गटातील दंगल प्रकरणात एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 20:28 IST2020-09-24T20:28:28+5:302020-09-24T20:28:41+5:30
जळगाव : मेहरुणमधील कसाईवाड्यात दोन गटात झालेल्या दंगलीच्या गुन्ह्यात शेख जब्बार शेख गफूर कुरेशी (४९,रा.अक्सा नगर) याला एमआयडीसी पोलिसांनी ...

दोन गटातील दंगल प्रकरणात एकाला अटक
जळगाव : मेहरुणमधील कसाईवाड्यात दोन गटात झालेल्या दंगलीच्या गुन्ह्यात शेख जब्बार शेख गफूर कुरेशी (४९,रा.अक्सा नगर) याला एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. ३० आॅगस्ट रोजी दुपारी पावणे दोन वाजता पिरजादे व कुरेशी गटात वाद होऊन दंगल उसळली होती. माजी नगरसेवक इकबालोद्दीन जियाउद्दीन कुरेशी यांच्या फिर्यादीवरुन कुरेशी गटाच्या १४ जणांविरुध्द प्राणघातक हल्ला व दंगलीचा गुन्हा दाखल झाला होता. पिरजादे गटाविरुध्दही गुन्हा दाखल आहे. शेख जब्बार कुरेशी हा मास्टर कॉलनीत आल्याची गुप्त माहिती कॉन्स्टेबल मुदस्सर काझी यांना मिळाली होती. उपनिरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील, योगेश बारी व अशपाक शेख यांनी सापळा रचून कुरेशी याला अटक केली.