रिचार्जच्या नावाने १७ लाखात गंडा घालणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 12:14 PM2019-10-10T12:14:27+5:302019-10-10T12:14:54+5:30

भोपाळमधून घेतले ताब्यात

One arrested for smuggling Rs 3 lakh in the name of recharge | रिचार्जच्या नावाने १७ लाखात गंडा घालणाऱ्याला अटक

रिचार्जच्या नावाने १७ लाखात गंडा घालणाऱ्याला अटक

googlenewsNext

जळगाव : मोबाईल रिचार्ज बॅलेन्स उपलब्ध करुन देण्याच्या नावाखाली अनेकांना १७ लाख ४५ हजार ३२४ रुपयात गंडा घालणाºया समीर शेख उर्फ राजा भाई उर्फ मोहम्मद कलीमोद्दीन खान (रा.रामनगर) याला सायबर पोलिसांनी दहा महिन्यानंतर भोपाळ येथून अटक केली.
समीर शेख याने गतवर्षी बीग किंग व्हॅलेट व अतीया पे वर्ल्ड हे दोन बेकायदेशीर अप्लीकेशन तयार केले. या वेबसाईटवर अनेक लोकांना लिंक केले. या माध्यमातून त्याने मोबाईल रिचार्ज बॅलेन्स देण्यासाठी जास्त कमिशन देण्याचे आमीष नागरीकांना दिले होते. त्यानुसार अमान इरफान अन्सारी (रा.फातीमानगर) याला १७ लाख ४५ हजार ३२४ रुपयांमध्ये गंडविले होते. भाविक रमेशचंद वेद, मोहम्मद नासिर अन्वर हुसेन, रिजवान अहमद शेख रमजानी, अशफाक खान अयुब खान, डॉ.शेख फिरोज, अहमद इबने मोहम्मद युसूफ, शेख जहीर अहमद कासम, अल्ताफ खान अयुब खान, अल्ताफ मुनाफ खाटीक या लोकांकडून त्याने लाखो रुपये घेऊन मोबदल्यात बॅलेन्स दिला नव्हता. पैशासाठी तगादा लागल्याने समीर हा जळगावातून पळून गेला होता.
समीरला पकडण्यासाठी फिर्यादीने उडविली होती देशभरात खळबळ
पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर काही महिने उलटूनही आरोपीला अटक होत नसल्याने फिर्यादी अमान इरफान पिंजारी याने २५ मे रोजी आरोपींचे फेसबुक अकॉऊंट हॅक करुन त्यावरुन आरोपी पती व पत्नीच्या नावे देशभरात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती.
यावेळी सर्वत्र खळबळही उडाली होती. फेसबुक व मोबाईल कंपन्यांच्या माध्यमातून पोलिसांची छडा लावून अमान पिंजारीला अटक झाली होती. पोलीस मला अटक करु शकतात, मग समीर याला का अटक करीत नाहीत असा प्रश्न उपस्थित करुन सायबर पोलिसांवर आरोप केले होते.
नाव बदलवून राहिला भोपाळमध्ये
संशयित समीर हा नाव बदलवून भोपाळमध्ये राहत होता. याआधी तो इंदूर शहरात राहत होता, मात्र पोलीस तेथे पोहचल्याने त्याने हे ठिकाण बदलविले होते. आता जहीर खान असे नाव बदलून राहत असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी, उपनिरीक्षक अंगत नेमाने, वसंत बेलदार, श्रीकांत चव्हाण, दिलीप चिंचोले, अजय सपकाळे, आफ्रीन मन्सुरी यांच्या पथकाने त्याला भोपाळ शहरातून ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला १४ आॅक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: One arrested for smuggling Rs 3 lakh in the name of recharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव