एका क्लिकचा पुढाकार, स्वच्छतेच्या चळवळीत हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:58 AM2019-09-15T11:58:17+5:302019-09-15T11:59:00+5:30
जि़ प. स्वच्छता विभाग । अॅपवर आल्या अकरा हजारांवर प्रतिक्रिया
आनंद सुरवाडे ।
जळगाव : स्वच्छ भारत अभियान प्रत्येक घटकापर्यंत पोहचला आहे की, नाही ? लोकांना याची कल्पना आहे का? याबाबत जनतेकडूनच प्रतिक्रिया मागणविण्यासाठी केंद्र सरकारने स्वच्छता सर्व्हेक्षण ग्रामीण अॅप तयार केले आहे. महिनाभरात जिल्हाभरातून या अॅपवर अकरा हजारांवर प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या आहेत़ या प्रतिक्रियांबाबत जळगाव राज्यभरात ९व्या क्रमांकावर आहे़
लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन एकत्रित त्यांचे विश्लेषण करून प्रत्येक जिल्ह्यासाठी एकत्रित धोरणात्मक निर्णय यातून घेऊन त्या पार्श्वभूमीवर बदल करण्यात येण्याची शक्यता आहे़ शिवाय लोक किती जागृत आहेत याबाबतची माहिती केंद्रस्तरापर्यंत यामाध्यमातून पोहचत आहे़ १४ आॅगस्टपासून सुरू झालेल्या अॅपबाबत जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने जनजागृती केली़ ग्रामपंचायतींना पत्र दिले, प्रतिक्रिया मागविल्या, परिणाम महिनाभरात ११ हजार ११५४ प्रतिक्रिया विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत़
३० सप्टेंबर पर्यंत या प्रतिक्रिया मागविण्यात येणार आहे़ ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाही ते लोक १८००५७२०११२ या टोल फ्री क्रमांकावरही प्रतिक्रिया नोंदवू शकतात़
महिनाभरात सातत्याने जळगाव जिल्हा या अभियानात दहाव्या क्रमांकावर आहे़
असे आहे अॅप
-एसएसजी २०१९ (स्वच्ठता सर्व्हेक्षण ग्रामीण) अॅप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केल्यानंतर राज्य, जिल्हा व भाषेची निवड केल्यानंतर चार प्रश्नांची प्रश्नावली येते
-त्यात स्वछ सर्व्हेक्षणाबाबत तुम्हाला माहिती ाहे का ?
-स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीमुळे तुमच्या गावातील सामान्य स्वच्छतेत किती सुधार झाला आहे़
-घनकचऱ्याच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी गाव पातळीवर काही व्यवस्था करण्यात आली आहे का ?
-द्रव कचºयासाठी गाव पातळीवर काही व्यवस्था करण्यात आली आहे का?
असे प्रश्न विचारले जातात.