भुसावळात वृक्षारोपण मोहिमेस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 02:54 PM2020-07-23T14:54:03+5:302020-07-23T14:56:31+5:30
एक कोटी २० लक्ष वृक्षारोपण मोहिमेचा गुरुवारी भुसावळात प्रारंभ करण्यात आला.
भुसावळ, जि.जळगाव : जगभरातील बदलत चाललेले हवामान लक्षात घेता, दवात-ए-इस्लामी हिंद या धार्मिक आणि सामाजिक संस्थेने संपूर्ण भारतात एक कोटी २० लाख झाडे लावण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी २० जुलै रोजी संपूर्ण भारताात एक विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, मौलाना अब्दुल हकीम साहिब, मौलाना नूर आलम साहिब यांच्या हस्ते वृक्ष लावून मोहिमेची सुरुवात करण्यात आली
गजानन राठोड म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे वृक्ष लागवडीचा विषय हरवला होता. दावते इस्लामी हिंदने मोहिमेद्वारे लोकांना जनजागृतीचा काम केलं त्यामुळे त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.
यावेळी, दावत-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय सदस्य, हाजी सलीम अतारी यांनी लोकांना या मोहिमेमध्ये सामील होण्यासाठी आणि स्वत:च्या परिसराभोवती झाडे लावावीत आणि आपला भारत एक हरित भारत बनवायला सांगितले.
या वेळी नगरसेवक हाजी मन्ना तेली, हाजी शफी पहलवान, माजी उपनगराध्यक्ष हाजी आशिक खान, माजी नगरसेवक हाजी साबिर शेख, सलीम सेठ चुडीवाले मौलाना कमरोदिन रिझवी, हाफिज गुलाम सरवार, दावत-ए-इस्लामीचे जिल्हाध्यक्ष जुबैर अत्तारी उपस्थित होते.