वैयक्तिक शौचालयासाठी एक कोटीवर अनुदान वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:11 AM2021-07-12T04:11:25+5:302021-07-12T04:11:25+5:30

नागरिकांनी उघड्यावर शौचास बसू नये, रोगराई पसरू नये, नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी प्रत्येक घराघरांत नागरिकांनी वैयक्तिक शौचालय बांधावे. ...

One crore grant for personal toilets | वैयक्तिक शौचालयासाठी एक कोटीवर अनुदान वाटप

वैयक्तिक शौचालयासाठी एक कोटीवर अनुदान वाटप

Next

नागरिकांनी उघड्यावर शौचास बसू नये, रोगराई पसरू नये, नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी प्रत्येक घराघरांत नागरिकांनी वैयक्तिक शौचालय बांधावे. शासनामार्फत शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपये अनुदानाचा लाभ दिला जातो. कुणाकडे शौचालय आहे किंवा नाही, असा सर्व्हे करून यादी तयार करण्यात आली होती.

आता वाढीव वैयक्तिक शौचालयांचे ऑनलाइनसाठी लाभार्थींचे कागदपत्रे मागविण्यात येणार आहेत. तशा ग्रामपंचायतींना सूचना दिलेल्या आहेत.

- चिंतामण राठोड, तालुका समन्वयक, स्वच्छ भारत, पंचायत समिती, भडगाव

भडगाव तालुक्यात वैयक्तिक शौचालयांसाठी एकूण एक कोटी बारा लाखांचे अनुदान सन २०२१, २०२० या वर्षातील लाभार्थींच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. वाढीव वैयक्तिक शौचालयाकामी लाभार्थींचे कागदपत्रे ऑनलाइन कामासाठी ग्रामपंचायतींकडून मागविण्यात आले आहेत. तशा सूचना ग्रामसेवकांना देण्यात आल्या आहेत.

-आर. ओ. वाघ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, भडगाव

Web Title: One crore grant for personal toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.